शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या अंमलबजावणी कशी करणार?

By admin | Updated: June 28, 2016 04:12 IST

शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अस्तित्वात आला असला तरी या कायद्याची राज्यात प्रभावी अंमलबजावणी केली जात नाही

मुंबई : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अस्तित्वात आला असला तरी या कायद्याची राज्यात प्रभावी अंमलबजावणी केली जात नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोणते धोरण आखणार? अशी विचारणा केली. तर राज्य सरकार व मुंबई महापालिकेला आतापर्यंत कशा प्रकारे या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे? याची तपशीलवर माहिती येत्या तीन आठवड्यांत देण्याचे निर्देश दिले आहेत.रिता कनोजीया या विधवेच्या चार वर्षांच्या मुलाला चेंबूरच्या लोकमान्य टिळक हायस्कूलने छोटा शिशूमध्ये प्रवेश देण्यास नकार दिला. रिता यांच्या पतीची लाँड्री होती. २०१४मध्ये कॅन्सरमुळे त्यांचेनिधन झाले. त्यांच्या दोन्ही मुली याच शाळेत शिकत आहेत. त्यामुळे त्यांनी मुलालाही याच शाळेत प्रवेश मिळावा, म्हणून अर्ज भरला. शाळेने त्यांना १०,५०० रुपये फी भरण्यास सांगितले. रिता यांना आर्थिक परिस्थितीमुळे एवढी फी एकाच वेळी भरणे शक्य नसल्याने त्यांनी ही रक्कम हप्त्यामध्ये भरण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती शाळा व्यवस्थापनाला केली. मात्र शाळेने हप्त्यामध्ये पैसे घेणे नाकारले. त्यामुळे कनोजिया यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती.गेल्या सुनावणीत न्या. कानडे यांनी शाळेला हप्त्यामध्ये फी घेण्याबाबत विचार करण्यास सांगितले. ‘तुम्ही या पर्यायाचा विचार करा; अन्यथा मी फी भरतो. पण मुलाला शिक्षणापासून वंचित ठेवू नका,’ असे न्या. कानडे यांनी म्हटले. खुद्द उच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशांनी फी भरण्याची तयारी दाखविल्याने शाळेने मुलाच्या फीची तजवीज करत सोमवारपासून त्याला शाळेत येण्याची परवानगी दिल्याची माहिती कनोजिया यांच्या वकिलांनी खंडपीठाला सोमवारच्या सुनावणीत दिली.‘हा प्रश्न एका मुलाचा नाही. अशी अनेक मुले असतील ज्यांना फीमुळे प्रवेश नाकारण्यात येत असेल. आरटीईअंतर्गत मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यात आले आहे. मात्र राज्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. नुसता कायदा असून काय उपयोग?’ असे म्हणत उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी काय धोरण आखणार? अशी विचारणा केली. (प्रतिनिधी)>तपशीलवार माहिती द्या!याचिकेद्वारे निदर्शनास आलेली बाब गंभीर असल्याने उच्च न्यायालयाने या रिट याचिकेचे जनहित याचिकेत रूपांतर केले. तसेच याचिकाकर्त्यांना मुंबई महापालिकेला प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले. तसेच राज्य सरकार व मुंबई महापालिकेला त्यांनी आतापर्यंत या कायद्याची कशा प्रकारे अंमलबजावणी केली आहे, याची तपशीलवार माहिती येत्या तीन आठवड्यांत देण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले.