शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

लाचखोर मोकाट कसे

By admin | Updated: August 19, 2014 01:01 IST

नागपूर आणि अमरावती परिक्षेत्रात लाचखोरीची सरासरी ७८ टक्के प्रकरणे निर्दोष ठरून केवळ २२ टक्के प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे. संपूर्ण राज्यातील शिक्षेचे प्रमाण २३ टक्के आहे.

रंगलेले हात होताहेत बेरंग : २२ टक्के प्रकरणात शिक्षानागपूर आणि अमरावती परिक्षेत्रात लाचखोरीची सरासरी ७८ टक्के प्रकरणे निर्दोष ठरून केवळ २२ टक्के प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे. संपूर्ण राज्यातील शिक्षेचे प्रमाण २३ टक्के आहे. राज्यातील विशेष न्यायालयात २००९ मध्ये एकूण ४६६ प्रकरणे निकाली लागून १०६ प्रकरणात शिक्षा आणि ३६० प्रकरणे निर्दोष सुटली. २०१० मध्ये ३५३ प्रकरणे निकाली लागून ६८ मध्ये शिक्षा होऊन २८५ प्रकरणे निर्दोष ठरली. २०११ मध्ये ३८३ प्रकरणांपैकी ९० प्रकरणांमध्ये शिक्षा होऊन २९३ प्रकरणे निर्दोष ठरली. २०१२ मध्ये ४९४ प्रकरणांपैकी ११८ मध्ये शिक्षा होऊन ३७६ प्रकरणे निर्दोष ठरली. २०१३ मध्ये ३८७ प्रकरणांपैकी ८० मध्ये शिक्षा होऊन ३०७ प्रकरणे निर्दोष ठरली. चालूवर्षी आतापर्यंत १५९ प्रकरणांपैकी ४६ मध्ये शिक्षा होऊन ११३ प्रकरणे निर्दोष ठरली. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि गोंदियाचा समावेश होणाऱ्या नागपूर परिक्षेत्रात २००९ मध्ये ८९ प्रकरणांपैकी २५ मध्ये शिक्षा होऊन ६४ प्रकरणे निर्दोष ठरली. २०१० मध्ये ३८ प्रकरणांपैकी ६ मध्ये शिक्षा होऊन ३२ प्रकरणे निर्दोष ठरली. २०११ मध्ये ४८ प्रकरणांपैकी १३ मध्ये शिक्षा होऊन ३५ प्रकरणे निर्दोष ठरली. २०१२ मध्ये ३९ प्रकरणांपैकी ७ मध्ये शिक्षा होऊन ३२ प्रकरणे निर्दोष सुटली. २०१३ मध्ये ३५ प्रकरणांपैकी ७ मध्ये शिक्षा होऊन २८ प्रकरणे निर्दोष ठरली. तर चालू वर्षी २०१४ मध्ये आतापर्यंत ३१ पैकी ७ मध्ये शिक्षा आणि २४ प्रकरणे निर्दोष ठरली. अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिमचा समावेश होणाऱ्या अमरावती परिक्षेत्रात २००९ मध्ये ३३ प्रकरणांपैकी ७ मध्ये शिक्षा होऊन २६ प्रकरणे निर्दोष ठरली. २०१० मध्ये ३४ प्रकरणांपैकी ६ मध्ये शिक्षा होऊन २८ निर्दोष ठरले. २०११ मध्ये ३७ प्रकरणांपैकी ६ मध्ये शिक्षा होऊन ३१ प्रकरणे निर्दोष ठरली. २०१२ मध्ये ६२ प्रकरणांपैकी १७ मध्ये शिक्षा होऊन ४५ निर्दोष ठरली. २०१३ मध्ये ४६ पैकी १५ मध्ये शिक्षा होऊन ३१ निर्दोष ठरली. चालू वर्षी आतापर्यंत १८ प्रकरणांपैकी ३ प्रकरणात शिक्षा होऊन १५ प्रकरणे निर्दोष ठरली. ३०२ प्रकरणे मंजुरीविना अडलीसंबंधित आरोपीविरुद्ध न्यायालयात लाचखोरीचा खटला दाखल करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला शासनाची मंजुरी घ्यावी लागते. त्यासाठी मोठा विलंब होतो. काही प्रकरणात मंजुरीच मिळत नसल्याने त्याचा फायदा आरोपीला मिळतो. मंजुरीस लागणाऱ्या विलंबाचा फायदाही आरोपीला होतो. शासनाकडे मंजुरीसाठी राज्यातीलच एकूण ३०२ प्रकरणे असून त्यापैकी १११ प्रकरणे ९० दिवसांच्या वरची तर १९१ प्रकरणे ९० दिवसांच्या खालची आहेत. या विलंबामुळे ही प्रकरणे न्यायालयांमध्ये दाखल होऊ शकली नाहीत. यात महसूल विभागाची ८३, गृह विभागाची ६९, नगर रचना, महानगरपालिकांची ३४, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींची ३० प्रकरणे आहेत.