शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
3
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
4
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
5
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
6
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
7
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
8
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
9
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
10
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
11
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
13
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
14
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
15
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
16
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
17
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
18
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
19
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
20
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

वीज अनुशेष दूर होणार कसा?

By admin | Updated: January 6, 2015 00:58 IST

विकासाच्या सर्वच बाबतीत अन्याय होत असताना प्रस्तावित संरचना विकास योजनेतदेखील विदर्भाकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे. या योजनेसाठी विदर्भातील ११ जिल्हे मिळून अवघ्या ८७९ कोटी

संरचना विकास योजनेसाठी अवघे ८७९ कोटी नागपूर : विकासाच्या सर्वच बाबतीत अन्याय होत असताना प्रस्तावित संरचना विकास योजनेतदेखील विदर्भाकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे. या योजनेसाठी विदर्भातील ११ जिल्हे मिळून अवघ्या ८७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर पश्चिम महाराष्ट्राला मिळणारा वाटा १,८९८ कोटी रुपये इतका आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एकट्या बारामती विभागाला ९५५ कोटी रुपये मिळणार आहेत. विदर्भाच्या विकासाला खीळ घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे करण्यात आला आहे.विशेष म्हणजे विदर्भात वीजनिर्मितीचे मोठे प्रकल्प आहेत. ‘महाजेनको’ची ४० टक्के वीज या भागातच तयार होते. पण फक्त १४ टक्केच अनुदानाचा लाभ या भागाला मिळतो. राज्यातील सुमारे ५५ टक्के वीज विदर्भात निर्माण होते. परंतु येथील ग्रामीण भागातील लोकांनाच चक्क १८-१८ तासांच्या लोडशेडिंगचा सामना करावा लागतो. महावितरणतर्फे संरचना विकास योजनेंतर्गत २०१२-१३ ते २०१५-१६ या कालावधीसाठी ५,५५६ कोटी रुपयांचा प्रकल्प खर्च आराखडा तयार करण्यात आला आहे. यापैकी पश्चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांसाठी १,८९८.९७ कोटी, उत्तर महाराष्ट्राच्या तीन जिल्ह्यांसाठी १०७२.१४ कोटी, मुंबई-ठाण्यातील तीन जिल्ह्यांसाठी ७५२.८१ कोटी इतका वाटा निर्धारित करण्यात आला. एकूण रकमेनुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला १५७ कोटी रुपयांचा वाटा मिळायला हवा. परंतु विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या हाती प्रत्यक्षात ७९.९२ कोटी रुपये इतकाच वाटा येत आहे.याशिवाय वीजनिर्मिती प्रकल्पांमुळे विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये प्रदूषणाची पातळीदेखील वाढली आहे. येथे १३२ खासगी वीज प्रकल्प प्रस्तावित आहेत. याचाच अर्थ उत्पादनासोबत निर्यात आणि प्रदूषणाचे प्रमाणदेखील वाढीस लागेल. जमीन इथली, पाणी इथले अन् फायदा दुसऱ्या प्रदेशांना हा विदर्भावर अन्याय आहे, असे मत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी व्यक्त केले.(प्रतिनिधी)वेगळा विदर्भ हाच उपायराज्यावर आज प्रचंड कर्जाचा बोजा आहे. अशास्थितीत वीज अनुशेष दूर करणे ही अशक्यप्राय बाब आहे. यावर वेगळा विदर्भ करणे हाच उपाय आहे. परंतु वेगळा विदर्भ केल्यास महाराष्ट्र अंधारात बुडेल आणि पुणे-मुंबईचे कारखाने बंद पडतील, अशी भीती राज्यकर्त्यांना आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला वीज पुरवणाऱ्या विदर्भाला अंधारातच ठेवण्याचा हा डाव आहे का, असा प्रश्न विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे उपस्थित करण्यात आला आहे.