शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवस्मारकासाठी निधी कसा उभारणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 06:23 IST

राज्यावर कर्जाचा मोठा बोजा असताना अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी ३६०० कोटी रुपयांचा निधी कसा उभा करणार?

मुंबई : राज्यावर कर्जाचा मोठा बोजा असताना अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी ३६०० कोटी रुपयांचा निधी कसा उभा करणार? हे तपशीलवार स्पष्ट करण्याचे निर्देश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.स्मारकाला विरोध करणारी याचिका चार्टर्ड अकाउंटंट मोहन भिडे यांनी दाखल केली आहे. याऐवजी राज्य सरकारने नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, असे भिडे यांनी या याचिकेत म्हटले आहे. याचिकेतील प्रत्येक मुद्द्यावर सरकारने भूमिका स्पष्ट करावी. तीन आठवड्यांत उत्तर द्यावे, असे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले. अशा प्रकारचे स्मारक बांधण्यात लोकांचा रस नाही. सरकारने चांगल्या सुविधा पुरवाव्यात व सामान्यांचे राहणीमान सुधारावे, हीच सामान्यांची अपेक्षा आहे. सरकारला स्मारक बांधावेसे वाटत असेल तर त्यांनी आधी शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड-किल्ल्यांचे जतन करावे, असे याचिकेत म्हटले आहे. स्वातंत्र्यानंतर एकाही राज्य सरकारने स्वत:चा निधी खर्च करून स्मारके बांधली नाहीत. जी काही मोठी स्मारके आहेत, ती देणग्यांमधून उभारली आहेत, असे भिडे यांचे वकील केतन पारेख यांनी न्यायालयाला सांगितले. (प्रतिनिधी)>आधी समस्यांचे निवारण कराया स्मारकाच्या केवळ उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ७७ कोटी रुपये खर्च करण्यात आले. राज्य सरकारवर कर्जाचा बोजा असताना हा सर्व घाट घालण्यात आला आहे.राज्यात आरोग्य, शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक समस्या आहेत. त्यातच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्नही आहे. त्यामुळे सरकारने आधी या समस्यांचे निवारण करावे, असे भिडे यांचे वकील केतन पारेख यांनी न्यायालयाला सांगितले.