शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

युती झाल्यास मनसेला किती जागा

By admin | Updated: February 1, 2017 13:57 IST

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मातोश्रीवर दूत पाठवत टाळीसाठी हात पुढे केल्यानंतर सेना-मनसे एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

नाशिक : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मातोश्रीवर दूत पाठवत टाळीसाठी हात पुढे केल्यानंतर सेना-मनसे एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. यदाकदाचित सेना-मनसे यांच्यात युती झाल्यास मनसेच्या पारड्यात किती जागा पडतील, याबाबत गणिते मांडली जाऊ लागली आहेत. मात्र, मनसेने विनाअट युती करण्याचा पवित्रा घेतल्याने सेनेकडून नाशिकमध्ये ४० ते ४५ जागांवर बोळवण केली जाण्याची भीती मनसैनिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.शिवसेनेने भाजपाबरोबरची युती तोडण्याची घोषणा केल्यानंतर मनसेने शिवसेनेकडे युती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेने राजकीय स्तरावर उलथापालथ होण्याचे संकेतही मिळत आहेत. शिवसेनेचा जीव मुंबईत तर मनसेचा जीव नाशिकमध्ये अडकला आहे. त्यामुळे, सेना-मनसेत युती झाल्यास प्रामुख्याने, मुंबई आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी जागावाटपाबाबत पेच उद्भवणार आहे. सन २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेचे सर्वाधिक ४० नगरसेवक निवडून आले होते, तर शिवसेना-रिपाइं मिळून २२ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी बऱ्याच जागांवर सेना-मनसेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मनसेला मोठ्या प्रमाणावर गळती लागून आतापर्यंत पक्षाच्या २८ नगरसेवकांनी सोडचिठ्ठी दिली आहे. त्यातील १७ नगरसेवकांनी तर शिवसेनेत प्रवेश केला आहे. सद्यस्थितीत शिवसेनेने १२२ जागांवर उमेदवार देण्याची पूर्ण तयारी केली असून, मनसेनेही स्वबळावर लढण्याचा नारा दिलेला आहे. त्यामुळेच शिवसेनेकडे ८०० हून अधिक तर मनसेकडे ४७३ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. आता यदाकदाचित युतीची टाळी वाजलीच तर सेना-मनसे यांच्यात जागावाटप कशाप्रकारे होईल, या चर्चेला उधाण आले आहे. त्यातच मनसेने विनाअट युतीचा प्रस्ताव दिल्याने शिवसेनेकडून सुमारे ८० जागांची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. मनसेच्या पारड्यात ४० ते ४५ जागा टाकून बोळवण केली जाण्याची भीती मनसैनिकांना आहे. मनसैनिकांमध्ये युती व्हावी याबाबत तीव्र इच्छा असली तरी शिवसैनिकांमध्ये मतभेद आहेत.