शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयमधील शेकडो विद्यार्थी एकाच विषयात कसे काय नापास ?

By admin | Updated: November 18, 2016 16:22 IST

ठाणे शहरातील वागळे इस्टेट येथील शासकीय तंत्रनिकेतन अर्थात आयटीआयमध्ये शिक्षण घेत असलेल्या सुमारे साडेचारशे विद्यार्थांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 18 -  ठाणे शहरातील वागळे इस्टेट येथील शासकीय तंत्रनिकेतन अर्थात  आयटीआयमध्ये शिक्षण घेत असलेल्या सुमारे साडेचारशे विद्यार्थांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना एकाच विषयात नापास करण्यात आले आहे. दरम्यान या  विद्यार्थांवरील अन्यायाची माहिती मिळताच आ. जितेंद्र आव्हाड यांनी आयटीआयमध्ये जाऊन व्यवस्थापनाला जाब विचारला. त्यावेळी व्यवस्थापनाने सदर विद्यार्थ्यांचे पेपर पुन्हा तपासण्याचे आश्वासन दिले. 
वागळे इस्टेट येथील आयटीआयमध्ये सुमारे पाचशे ते साडे पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे सर्व विद्यार्थी या पूर्वीच्या सर्व परिक्षांमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. मात्र नुकत्याच घेतलेल्या  सहामाही परिक्षेत या मुलांना थिअरी या एकाच विषयात नापास करण्यात आले आहे.  विशेष म्हणजे केवळ 20 ते 25 विद्यार्थ्यांना पास करण्यात आले आहे.  विद्यार्थ्यांनी या संदर्भात प्राचार्यांशी संपर्क साधला असता प्राचार्यांनी सदर विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे शैक्षणिक वर्ष धोक्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी आ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आपली कैफियत मांडली. 
आ. जितेंद्र आव्हाड यांनी तत्काळ आयटीआयवर धडक दिली. मात्र त्याठिकाणी प्राचार्य उपस्थित नसल्याने आ. आव्हाड  यांनी संताप व्यक्त करून प्राचार्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. या विद्यार्थ्यांना त्यांचे पेपर पुन्हा  तपासून द्यावे,  अशी मागणी केली. तसेच सोमवारपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय न दिल्यास तीव्र  आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.  
यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित पवार , नगरसेवक अमित सरय्या आणि शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.