शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विषय बदलल्याने वेळापत्रक बनवायचे कसे?

By admin | Updated: April 15, 2017 02:01 IST

इयत्ता सातवी आणि नववीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला असून, इन्फर्मेशन कम्युनिकेशन अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी (आयसीटी) विषय रद्द करून दुसरा विषय घेण्याय आला

मुंबई : इयत्ता सातवी आणि नववीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला असून, इन्फर्मेशन कम्युनिकेशन अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी (आयसीटी) विषय रद्द करून दुसरा विषय घेण्याय आला आहे. तथापि, यासंदर्भात शाळांना कोणतीही माहिती पुरवण्यात आली नसल्याने शिक्षक आणि मुख्याध्यापक वेळापत्रक कसे बनवायचे? या संभ्रमात आहेत. शाळांचा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ठरवण्यात येतो. येत्या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता सातवी आणि नववीच्या अभ्यासक्रमात बदल केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पण, नक्की बदल कोणते आहेत, नवीन कोणता विषय घेण्यात आला आहे, याविषयी कोणत्याही स्वरूपाची माहिती शाळांना दिलेली नाही. त्यामुळे शिक्षक परिषदेने मंडळाला पत्र लिहिले आहे. नवीन वर्षाचे वेळापत्रक तयार करण्यासाठी आता शिक्षकांच्या हातात कमी दिवस उरले आहेत. २ मेपासून उन्हाळी सुटी सुरू होते. एप्रिल महिन्यात वेळापत्रकच नाही, तर शिक्षकांना विषयांचे वाटपदेखील करायचे असते. एप्रिल महिन्यातच प्रत्येक इयत्तेचे वेळापत्रक स्वतंत्र तयार करायचे असते. इयत्ता सातवी आणि नववीचे वेळापत्रक कसे तयार करायचे, हा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. शिक्षकांची होणारी गैरसोय लक्षात घेता लवकरात लवकर नवीन बदल शाळांना कळवावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)...तरच वेळ मिळेल२० एप्रिलपर्यंत विषय बदलीसंदर्भातील नवीन बदल शाळांना कळविण्यात आल्यास शिक्षकांच्या हातात १० दिवस राहतील आणि त्यांना वेळापत्रकासाठी वेळ मिळेल, असे परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.