शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्याचे तीन महिने कसे सरणार?

By admin | Updated: March 2, 2017 01:33 IST

खेड तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे

दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. धरण, तलाव बंधाऱ्यातील पाणी संपले आहे. उन्हाळ्याचे तीन महिने कसे जाणार, या भीतीने या परिसरातील नागरिक हतबल झाला आहे.तालुक्याच्या पूर्व भागातील गुळणी, जरेवाडी वाफगाव, चिंचबाईवाडी, टाकळकरवाडी, वरुडे, कनेरसर येथे दर वर्षी बेभरवशाचा पाऊस पडतो. यंदा परतीचा पाऊस या परिसरात पडलाच नाही. वाफगाव येथील मातीचे धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरले होते; मात्र धरणातून पाणी चारीच्या वाटे सोडण्याचे नियोजन केले नसल्यामुळे; तसेच सतत या धरणातील पाणीउपसा असल्याने धरण कोरडेठाक पडले आहे. पाणी नसल्यामुळे शेतातील पिके जळून गेली आहेत. जनावरांचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. गुळाणी येथील तलावातही १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येथे पाणीप्रश्न भेडवसणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वेळ नदी वरील वरुडे येथील कोल्हापूर पद्धतीचे दोन्ही बंधारे कोरडे पडले आहेत. मागील वर्षी एप्रिल, मे महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत निवडणुका जवळ आल्याने, अनेक पुढाऱ्यांनी या परिसरात पाण्याचे टँकर सुरू केले होते. मोफत गावोगावी-वाडी वस्त्यांवर पाणीवाटप करण्यात येत होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा; तसेच जनावरांचा पाणीप्रश्न मिटला होता. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका नुकत्याच संपल्या आहेत. जे निवडून आले, त्यांना या भागाचे काही देणे-घेणे नाही. त्यांना आमची पाच वर्षे गरजच नाही, मोफत टँकरचे यंदा पाणी मिळणार नाही. ‘गरज सरो, वैद्य मरो’ अशी आमची अवस्था झाली असल्याचे वाफगाव परिसरातील शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.प्रशासनाने या परिसरात टँकर लवकरच सुरू करावे, अशी मागणीही या वेळी शेतकऱ्यांनी केली.>नाझरे धरणातून दिवसाआड पाणीपुरवठामोरगाव : पुरंदर तालुक्यातील नाझरे धरणावर चार प्रादेशिक नळ पाणी योजना व एमआयडीसी अवलंबून आहे. धरणातील घटता पाणीसाठा लक्षात घेता, जूनपर्यंत पिण्याचे पाणी पुरण्यासाठी पाण्याचे दिवसाआड आठ तास असे नियोजन केले आहे. यामुळे बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांत पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.नाझरे जलाशयावर बारामती तालुक्यातील मोरगाव प्रादेशिक, पारगाव -माळशिरस, नाझरे व इतर गावे, जेजुरी अशा विविध योजना आहेत. पैकी मोरगाव प्रादेशिक योजनेवर मोरगाव, आंबी खुर्द, आंबी बुद्रुक, तरडोली, लोणी भापकर, माळवाडी (लोणी), जळगाव, काऱ्हाटी, कऱ्हावागज आदी १५ गावे अवलंबून आहेत.या योजनांद्वारे पाणीपुरवठा दिवसाआड १२ तास चालविला जात होता; मात्र घटता पाणीसाठी लक्षात घेता जूनपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यासाठी दिवसाआड या योजना ८ तास चालविण्यास सुरुवात केली आहे. तरडोलीसह परिसरातील १५ गावांसाठी दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे या गावांत तब्बल चार दिवसांनी पाणी मिळणार असून, ग्रामपंचायतींना पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे.>पाण्यासाठी भटकंती सुरूशिक्रापूर : पाबळ व परिसरातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सुरू झाली असून, अनेक वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. पाबळ येथील गावठाणात ग्रामपंचायत सदस्य अमोल जाधव मित्रमंडळाने एकत्रित येऊन पाण्याचा टॅँकर सुरू केला.