शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

..मग कसं? जावईबापू म्हणतील तसं!

By admin | Updated: August 19, 2014 00:57 IST

आवंदा कोन्च्या पक्षाचं तिकीट घ्यावं, ईचार करतुया.

(दिवाणखान्यात नेत्याच्या अस्वस्थ येरझारा.)
पत्नी : अवो कारभारी; येवढं कोन्चं टेन्शन घेतलाव?
नेता :  आवंदा कोन्च्या पक्षाचं तिकीट घ्यावं, ईचार करतुया.
पत्नी : दर इलिक्शानला तुमी येगयेगळं चिन्हं घेताव. मग आता कोन्चा पक्ष शिल्लक राहिला हाय?
नेता : आवंदा, भगव्या ‘पार्टी’ची चलती हाय. ती ‘पार्टी’ काय तरी हायटेक का बियटेकबी बनलीया म्हणं! आन् म्या पडलो खेडेगावकडचा रांगडा गडी. मग त्या ‘पार्टी’च्या नेत्याशी वळीख असलेला माणूसबी घावंना. पार डोस्क्याचा गुंता झालाय बग.
पत्नी : (हळूच खुसखुसत) तुमी कसले वो कारभारी? चवथी ‘नापास’ तरीबी ‘शिक्शानसम्राट’ हाव. धा वरसापास्नं ‘शुगर’ हाय तरीबी ‘साखरसम्राट’ म्हणवून घेताव. थोडं डोस्कं चालवा की. माज्याकडं हाय बगा लई भारी किल्ली.
नेता : (बायको आपली कळा खातेय; पण उपायही सुचवतेय म्हटल्यावर राग गिळत) सांग बये सांग. आता तूच एकली राहिलीस मला अक्कल शिकवायची.
पत्नी : अवोùù आपल्या जावयबापूला बोलवा की श्रवणाच्या पुजेला.
नेता : (जावयाचं नाव ऐकताच लगेच ताठर होत) नाव काढू नगंस त्याचं. म्या एवढा मोठा नेता; मातूर मलाच शानपना शिकवतूया बगावं तवा. थोबाडबी बगायचं नाय मला त्याचं.
पत्नी: तरीबी कायबी करुनशान बोलवाच म्हंते म्या.
नेता : (संशयानं ) आन् काय करायचं नंतर आपुन ?
पत्नी: गोड-धोड खाऊ घालुनशान त्यांस्नी टॉवेल, टोपी आन्  सफारीचा फुल आहेर करायचा. दोन तोळ्याची अंगठी आन् गोल्डन रिश्टवॉच बी द्यायचं.
नेता : (रागानं थरथरत) डोस्कं फिरलंय की काय ?
पत्नी : (समजावत) आवो.आपले जावयबापू पडले सांगली-कोल्हापूरकडचे. तिथं म्हणं त्यांच्या लई वळखी हायती..आन् तुमच्या त्या फुल्ल फार्मातल्या भगव्या ‘पार्टी’चा नेताबी म्हणं तिकडचाच जावई हाय. बरूबर लिंक लागंल बगा आपल्या जावयाकडनं. कोल्हापूर टू मुंबे डायरेक्ट व्हाया सुरत!
नेता : (कौतुकाश्चर्यानं डोळे विस्फारत) लईच हुश्शार निघालीùù की माजी बायकू. राजकारणामंदी इतकी वरसं राहुनशानबी मलाबी जे कळलं नाय, ते तुला समजलं बग. 
पत्नी : (तोंडाला पदर लावून मिस्किलपणो) मग कसं?
नेता : (टोपी नीट करत) जावईबापू म्हणतील तसं!
                            - सचिन जवळकोटे