शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

काळी आई कशी देऊ जी...

By admin | Updated: December 19, 2014 00:49 IST

काळी आईला कसली म्हणून ती आज पावली, पण अधिकारी शेत सोडण्यासाठी दबाव आणत्यात. दोन एकरचा हा पट्टा सोडून काय करू, लेकरानले काय खावू घालू, की कुटुंबासोबत म्या बी आत्महत्या करू,

कैफियत : दोन एकर शेतीसाठी आनंदाचा संघर्ष सुमेध वाघमारे - नागपूरकाळी आईला कसली म्हणून ती आज पावली, पण अधिकारी शेत सोडण्यासाठी दबाव आणत्यात. दोन एकरचा हा पट्टा सोडून काय करू, लेकरानले काय खावू घालू, की कुटुंबासोबत म्या बी आत्महत्या करू, अशी कैफियत आनंदा ताजने या शेतकऱ्याने मांडली.भूमिहीनांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी मानवी हक्क अभियान संघटनेने आज गुरुवारी विधानभवनावर मोर्चा काढला. या मोर्चात आनंदाही सहभागी झाला होता. वाशीम जिल्हातील आमखेडा येथून तो आला होता. हातात पिवळा झेंडा उंच धरीत तोही पोटतिडकीने नारे देत होता. मायबाप सरकार आपलं मागणं मान्य करून आपली जमीन आपल्या ताब्यत देईल, एवढीच त्याची अपेक्षा होती. आनंदाला बोलत केले असता तो म्हणाला, १९८५ पासून हा दोन एकरचा पट्टा वाहतो. त्यावेळी शेतीत दगड-धोंडे होते. काटेरी झुडूप होते. राबराब राबलो तेव्हा कुठं शेत उभं झालं. आता कुठे हातात पीक येऊ लागलं. पण अधिकारी ही जमीन गायरान असल्याचे सांगून घाबरवतात. पिकवू नको म्हणून दटावतात. काही पोट्टे जाणूनबुजून शेतात शिरतात, भरलं पीक नासवतात. जमीन आपल्या नावान नसल्याने तक्रार तरी कुठं करावी. दुष्काळ, गारपिटीचा एक पैसा मिळत नाही. शेती बुडली म्हणजे ते वर्ष आमच्यासाठी लई कठीण जाते....काय करू जी...दोन पोर आहेत. त्यानले शिकवून मोठं करायच सपन आहे. ते सपनही हे लेकाचे पाहू देत नाही. दोन एकरच्या शेतीत दोन वेळची भाकर मिळत नाही जी. दुसऱ्यांच्या शेतात राबतो, मजुरी करतो म्हणून जमते. पण कुटुंबाला आधार त्या दोन एकर काळ्या आईचाच. शासनाने ही जमीन ताब्यात दिलं तर जमते जी...असे म्हणत रडायला आलेला आनंदाने तोंड फिरवले... हातातील पिवळा झेंडा आणखी उंच धरला...