शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

विवाहविषयक संकेतस्थळांवर नियंत्रण कसे मिळवणार?

By admin | Updated: March 25, 2016 01:12 IST

महाराष्ट्र रेग्युलेशन आॅफ मॅरेज ब्युरो अ‍ॅण्ड रजिस्ट्रेशन आॅफ मॅरेज अ‍ॅक्ट, १९९८ यांतर्गत विवाह मंडळांवर नियंत्रण मिळवण्याची कल्पना राज्य सरकारची होती. मात्र आता विवाहविषयक

मुंबई : महाराष्ट्र रेग्युलेशन आॅफ मॅरेज ब्युरो अ‍ॅण्ड रजिस्ट्रेशन आॅफ मॅरेज अ‍ॅक्ट, १९९८ यांतर्गत विवाह मंडळांवर नियंत्रण मिळवण्याची कल्पना राज्य सरकारची होती. मात्र आता विवाहविषयक संकेतस्थळांनी विवाह मंडळांना गिळंकृत केले आहे आणि सरकार या संकेतस्थळांवर नियंत्रण मिळवू शकत नाही, अशा शब्दांत सरकारला फटकारत उच्च न्यायालयाने विवाहविषयक संकेतस्थळांवर नियंत्रण कसे आणणार? अशी विचारणा करत एका महिन्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.विवाहविषयक संकेतस्थळे अनेक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. विवाह मंडळे तसेच अशा संकेतस्थळांची तपशीलवार माहिती सादर करा, असे निर्देश न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने सरकारला दिले. हुंडा प्रतिबंधक कायद्याचे प्रभावीपणे पालन केले जात नाही. तसेच हुंडा प्रतिबंध अधिकाऱ्याची नियुक्तीदेखील अद्याप न करण्यात आल्याबद्दल अ‍ॅड. प्रसिला सॅम्युअल यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे होती.या याचिकेच्या सुनावणीवेळी राज्य सरकारने हुंडा प्रतिबंध अधिकारी म्हणून पोलीस ठाण्याच्या इनचार्जची नियुक्ती केल्याबद्दल उच्च न्यायालयाने सरकारला चांगलेच खडसावले. हुंडा प्रतिबंध अधिकारी म्हणून सरकार पोलिसांची नियुक्ती करू शकते. मात्र त्यासाठी निकष लावणे आवश्यक आहे. त्यांचे शिक्षण, त्यांची पात्रता, समाजात त्यांचा असलेला दर्जा इत्यादीविषयी सरकारने विचार केला पाहिजे. परंतु, याचा सारासार विचार न करताच सरकारने पोलीस ठाण्यातील इनचार्जना हुंडा प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. या अधिकाऱ्यांना त्यांची अन्य कामे आहेत. त्यांच्यावर भार टाकू नका, असे खंडपीठाने सांगितले.तसेच हुंडा प्रतिबंध कायद्यांतर्गत राज्य सरकारने सल्लागार मंडळ नेमणेही बंधनकारक आहे. मात्र सरकारने तेही अद्याप नेमलेले नाही. त्यावर खंडपीठाने हुंडा प्रतिबंध अधिकारी आणि सल्लागार मंडळ नेमण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश सरकारला दिले.विवाह नोंदणी व विवाह मंडळांच्या नोंदणीच्या कामांकरिता स्वतंत्र विभाग सुरू करणे शक्य आहे का ते पाहावे. त्याची आवश्यकता आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी अशा विभागाची आवश्यकता आहे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. (प्रतिनिधी)या याचिकेच्या सुनावणीवेळी राज्य सरकारने हुंडा प्रतिबंध अधिकारी म्हणून पोलीस ठाण्याच्या इनचार्जची नियुक्ती केल्याबद्दल उच्च न्यायालयाने सरकारला चांगलेच खडसावले. हुंडा प्रतिबंध अधिकारी म्हणून सरकार पोलिसांची नियुक्ती करू शकते. मात्र त्यासाठी निकष लावणे आवश्यक आहे. त्यांचे शिक्षण, त्यांची पात्रता, समाजात त्यांचा असलेला दर्जा इत्यादीविषयी सरकारने विचार केला पाहिजे. परंतु, याचा सारासार विचार न करताच सरकारने पोलीस ठाण्यातील इनचार्जना हुंडा प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.