शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचा सामना कसा करणार?

By admin | Updated: March 31, 2016 02:17 IST

दिवसेंदिवस पाणीटंचाईचा प्रश्न भीषण होत असल्याने, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी काय उपाययोजना आखण्यात आल्या आहेत? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला

मुंबई : दिवसेंदिवस पाणीटंचाईचा प्रश्न भीषण होत असल्याने, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी काय उपाययोजना आखण्यात आल्या आहेत? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत पुढील आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.‘पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर पावले उचलली पाहिजेत. वेळ निघून चाललाय, पुढील दोन-तीन महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्ही (राज्य सरकार) युद्धपातळीवर काही केले नाही, तर आपत्कालीन स्थिती निर्माण होईल. तुम्हाला यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल,’ असे न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. कर्णिक यांच्या खंडपीठाने म्हटले.राज्यात दुष्काळसदृश्य स्थिती असतानाही सरकारने कुंभमेळाव्याच्या शाही स्नानासाठी गोदावरी नदीमध्ये वारंवार पाणी सोडले. मराठवाड्यातील लोकांना पाण्याची भीषण टंचाई जाणवत असतानाही सरकारने कुंभमेळ्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरुद्ध पुण्याचा प्राध्यापक एच. एम. देसरडा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने सरकारला धरणातले पाणी शाही स्नानासाठी न सोडण्याचा आदेश दिला. पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठीच पाणी सोडण्यात यावे, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी) ठोस पावले उचला अन्यथा नुकसान...राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीवर तत्काळ उपाय करणे आवश्यक आहे, असे म्हटले. ‘राज्यातील अनेक गावांत आणि शहरांत पाणीटंचाईचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. दुष्काळामुळे मराठवाडा आणि विदर्भामध्ये हजारो लोकांनी (शेतकरी) आत्महत्या केल्या. जर राज्य सरकारने काही ठोस पावले उचलली नाहीत तर आणखी नुकसान होईल,’ असे खंडपीठाने म्हटले.