शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाखांत कामे कशी करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2017 04:51 IST

भाषा, साहित्य आणि संस्कृती जतनासाठी राज्य शासनातर्फे अद्याप तुटपुंजे अनुदान मिळत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : भाषा, साहित्य आणि संस्कृती जतनासाठी राज्य शासनातर्फे अद्याप तुटपुंजे अनुदान मिळत आहे. राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाने अनुदानाची रक्कम पाच लाखांवरून आठ लाख रुपये करण्याचा अध्यादेश काढून दोन वर्षे उलटल्यानंतही अद्याप प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. अनुदानाच्या बदल्यात शासनाने कामांचे स्वरूप आणि अटींची जंत्रीच साहित्य महामंडळाकडे पाठवली आहे. वाढीव तीन लाख रुपयांत ३० लाखांची कामे कशी करणार, असा सवाल उपस्थित करत महामंडळ आणि घटक संस्थांनी अनुदानाची वाढीव रक्कम स्वीकारलेली नाही.दरवर्षी वाङ्मयीन उपक्रमांसाठी राज्य शासनाकडून राज्यातील ७ संस्थांना ५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यामध्ये साहित्य महामंडळासह मुंबई साहित्य संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, कोकण साहित्य परिषद, दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ आणि यांचा समावेश आहे. मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या विकासासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य साहित्य व संस्कृती मंडळाकडून शासनाला पाठवण्यात आला. त्यानंतर पाच लाखांवरून ही रक्कम आठ लाख रुपये करण्याचा अध्यादेशही काढण्यात आला. हे अनुदान नसून, केवळ आर्थिक सहकार्य असल्याचे स्पष्ट करत ही रक्कम तुटपुंजी असल्याचे महामंडळाने निदर्शनास आणून दिल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी दिली.>वाढीव अनुदान स्वीकारले नाही‘शासनातर्फे महाराष्ट्र मंडळांना प्रत्येकी दोन लाख रुपये दिले जातात. त्या तुलनेत साहित्य संस्थांना तुटपुंजे आर्थिक सहकार्य केले जाते. वाढीव अनुदानाच्या बदल्यात अटींची पूर्तता करण्याची जंत्रीच दिली आहे. शासनाची कामे करण्याची जबाबदारी साहित्य महामंडळाची नाही. ती कामे शासकीय विभागांकडे सोपवावीत. शासनाच्या अटी मान्य नसल्याने महामंडळ आणि घटक संस्थांनी वाढीव अनुदानाची रक्कम स्वीकारलेली नाही, असे साहित्य मंडळाचे अध्यक्ष जोशी म्हणाले़मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी अनुदानाची रक्कम किमान २५ लाख रुपयांपर्यंत वाढवायला हवी. राज्याच्या अंदाजपत्रकात मराठी भाषेसाठी केवळ १७ कोटींची तरतूद असून, ती ३० कोटी रुपये करावी.- श्रीपाद जोशी, अध्यक्ष : साहित्य महामंडळ