शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, यावर विश्वास कसा ठेवायचा ?- उद्धव ठाकरे

By admin | Updated: June 26, 2017 11:08 IST

40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, यावर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

 ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 26-  राज्य सरकारने शेतकऱ्यांचं दीड लाख रूपयांपर्यतचं कर्ज माफ केलं आहे. या कर्जमाफीमुळे एकुण 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असा दावा सरकारने केला आहे. पण प्रत्यक्षात 40 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे का? तसंच या आकडेवारीवर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. सरकारकडे याची पूर्ण आकडेवारी आहे ती त्यांनी सादर करावी तसंच कोणत्या गावातील किती शेतकऱ्यांचा सातबारा कर्जमाफीनंतर कोरा झाला याचीही माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील संवाद यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. या दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी  हे वक्तव्य केलं आहे. नगर, नाशिकमधील शेतकरी अद्यापही त्रस्त आहेत त्याबाबत अभ्यासगट स्थापन करण्याच्या सरकारला सूचना देणार असल्याचं उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. तसंच कर्जमाफीच्या आंदोलनात ज्या प्रमाणे शिवसेना कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला त्याच प्रकारे प्रत्येकाने आपापल्या गावातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीची माहिती उपलब्ध करून द्यावी, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. 
शेतकरी आणि शिवसेना एकत्र आल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी शक्य झाली.  शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी राहिली आणि यापुढेसुद्धा राहिलं. शिवसेनेकडून शेतकऱ्यांच्या सूचनांचा आणि मागण्यांचा पाठपुरावा शिवसेना करणार आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे.  
 कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं पण या आंदोलनादरम्यान पुणतांब्यातील ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते तातडीने मागे घ्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. तसंच  नियमितपणे कर्ज परत फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जी मदत मिळणार आहे त्या मदतीत वाढ केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवसेनेच्या पाठीशी शेतकरी आहेत त्यामुळे कर्जमुक्तीला फॅशन म्हणणाऱ्यांना कर्जमाफी करावीच लागली, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना टोला लगावला आहे. जून 2016 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज राज्य सरकारने माफ केलं आहे पण आता जून 2017 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आहे त्यांचं कर्ज माफ करावं, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
औरंगाबादमधील संवाद यात्रेनंतर 29 जूनपासून उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या सूचनांची आणि मागण्यांची माहिती घेतली जाणार आहे.