मुंबई : बॉम्बस्फोट प्रकरणातील सिद्धदोष आरोपी याकूब मेमन याच्या फाशीला काही दिवस शिल्लक असताना जेलची सुरक्षा व्यवस्था भेदून एका वकिलाने मेमन याची भेट घेण्याचे प्रकरण गंभीर आहे. यामुळे गृहखात्याच्या सुरक्षा व्यवस्थेतील हलगर्जीपणाची हद्द झाली असून, गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आ. किरण पावसकर यांनी केली आहे. अवैध ओळखपत्राच्या आधारे याकूब मेमनची भेट घेतलेल्या वकिलाचे नाव शुबैल फारुख असे असून, त्याने जेल प्रशासनाकडून ज्या ओळखपत्राच्या आधारे प्रवेश मिळवला त्या ओळखपत्राची वैधता ३१ जानेवारी २०१३ रोजी संपलेली आहे. या अवैध ओळखपत्राद्वारे थेट जेलमध्ये जाऊन शुबैल फारुख या वकिलाने जवळपास तासभर याकूब मेमनची भेट घेतल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे शुबैल फारुख व याकूब मेमन यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, शुबैल फारुख खरोखरच वकील होता का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
याकूबला वकील कसा भेटला?
By admin | Updated: July 23, 2015 01:37 IST