शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जप्त केलेले पिस्तूल बाहेर पडले कसे?

By admin | Updated: June 10, 2017 02:59 IST

गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरलेले शस्त्र एकच असल्याचा अहवाल बंगलोर फॉरेन्सिक लॅबने दिला आहे

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरलेले शस्त्र एकच असल्याचा अहवाल बंगलोर फॉरेन्सिक लॅबने दिला आहे; त्या अहवालाची प्रत ‘सीबीआय’ने उच्च न्यायालयात सादर केली आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येतील पिस्तूल पुणे पोलिसांच्या कस्टडीत असताना ते बाहेर गेले कसे? त्यामध्ये कोणी पोलीस अधिकारी फुटीर झाला आहे काय? यासंबंधीची चौकशी ‘एसआयटी’ने का केली नाही? असे मुद्दे आरोपीचे वकील समीर पटवर्धन यांनी शुक्रवारी न्यायालयात उपस्थित केले. सुमारे पाच तास युक्तिवाद ऐकून जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी पुढील सुनावणी १६ जूनला ठेवली. या वेळी दुसऱ्यांदा सरकार पक्षातर्फे म्हणणे सादर केले जाणार आहे. समीर गायकवाडच्या जामीन अर्जावर मागील सुनावणीत सरकार पक्षातर्फे म्हणणे सादर केले होते. त्यावर पटवर्धन यांनी म्हणणे सादर केले. गायकवाड याला अटक करून एक वर्ष नऊ महिने होत आहेत. तरीही दोषारोपपत्र निश्चित केले जात नाही. सरकार पक्षाने, ‘‘या गुन्ह्यातील संशयित विनय पवार व सारंग अकोळकर हे फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. मडगाव बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार रुद्रगोंडा पाटील याच्याशी समीरचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे तो फरारही होऊ शकतो. या हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे,’’ अशी कारणे पुढे करून जामीन मिळू दिला नाही. ज्योती कांबळे व सुमित खामकर यांच्या मोबाइलचे संभाषण ताब्यात मिळाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी समीरला अटक केली. पोलिसांनी इतका उशीर का लावला, असा सवाल त्यांनी केला.दाभोलकर यांची हत्या २० आॅगस्ट २०१३ रोजी झाली. त्यानंतर काही दिवसांत पुणे पोलिसांनी शस्त्र तस्कर मनिष नागोरी याच्याकडून पिस्तूल जप्त केले. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी पानसरे यांची हत्या झाली. या दोन हत्यांमध्ये १८ महिन्यांचा फरक आहे. पुणे पोलिसांत जप्त असलेले पिस्तूल पानसरे हत्येसाठी वापरले कसे? ते बाहेर गेले कसे? कोणी पोलीस अधिकारी फुटीर झाला आहे काय? याची चौकशी ‘एसआयटी’ने का केली नाही. काडतुसे आणि रिकाम्या पुंगळ्या स्कॉटलंड यार्डच्या फॉरेन्सिक लॅबकडे पाठविल्याचे तपास यंत्रणेकडून सांगितले जात होते; पण त्या पाठविलेल्या नाहीत. गायकवाड याच्याविरोधात कसलेही पुरावे नाहीत. ‘एसआयटी’ने फक्त त्याच्याविरोधात माहोल तयार केला आहे, असेही पटवर्धन यांनी न्यायालयास सांगितले.