शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

जाहीरनाम्याची चोरी कशी झाली?

By admin | Updated: January 20, 2017 00:14 IST

आपल्या जाहीरनाम्याला पाय कसे फुटले, जाहीरनाम्यातले मुद्दे शिवसेनेने आजच कसे जाहीर करुन टाकले

अतुल कुलकर्णी,

मुंबई- आपल्या जाहीरनाम्याला पाय कसे फुटले, जाहीरनाम्यातले मुद्दे शिवसेनेने आजच कसे जाहीर करुन टाकले यावरुन भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये संशयकल्लोळ नाट्य रंगलेले असताना आमच्यावर लक्ष ठेवून असलेल्या भाजपाने आमच्या घोषणेनंतर तात्काळ ‘आम्ही हे करणारच होतो’ अशी भूमिका घेतल्याचे शिवसेना म्हणत आहे. एका घोषणेने शिवसेनेने भाजपा नेत्यांनी आजवर धरलेल्या ताठरपणातील हवाच काढून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.उध्दव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर हडबडलेल्या भाजपा नेत्यांनी ‘आमच्या जाहीरनाम्याचे काम गेले १५ दिवस सुरु होते, ते पूर्ण झाले आहे’, असे सांगण्यासाठी पत्रकारपरिषद बोलावली. राज्य सरकारकडे अधिवेशनामध्येच आमदार म्हणून आपण ६०० स्क्वे फुटाच्या खालील घरावर टॅक्स लागू नये अशी मागणी केल्याचे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले. मात्र आम्ही सत्तेत आहोत, मागण्या करत बसत नाही, आम्ही घोषणा करतो आणि त्या अंमलात आणतो असे टोकदार उत्तर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले गुजराती समाजाचे नेते हेमराज शहा यांनी भाजपाला सुनावले. जर शेलार यांनी ६०० स्वे. फुटाच्या घरांना करमाफी द्यायची होती तर त्यांनी आधीच हे का जाहीर केले नाही, उध्दव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर आम्हीच ही मागणी केली होती या म्हणण्याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणतात, असेही शहा यांनी सुनावले. शहा गुजराती समाजाचे नेते आहेत. त्यामुळे हा आहेर भाजपाला चांगलाच झोंबणारा आहे.मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त आणि चांगले होईपर्यंत स्ट्रीट टॅक्स घ्यायचा नाही असे आमच्या जाहीरनाम्यात आहे, आमच्यामुळेच ठेकेदार गजाआड गेले, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असेही शेलार म्हणाले. मात्र मुंबईच्या रस्त्यांची अवस्था केवळ ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमुळे झालेली नाही. स्टँडींग कमिटीत ‘अंडरस्टँडींग’ होताना भाजपाही सहभागी नव्हती का? फक्त ठेकेदारांना बळीचे बकरे बनवताना त्यांच्यांशी कोणी किती ‘अंडरस्टँडींग’ केले याची चौकशी कोण करणार असे एका ठेकेदाराने आपले नाव न सांगता बोलून दाखवले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपा महापालिकेच्या भ्रष्ट कारभारातून स्वत:ला कितीही दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असली तरी त्यांची त्यातून सुटका होताना दिसत नाही. स्वत: सत्तास्थानी असतानाही मुंबई महापालिकेत टॅक्स टेररीझम सुरु आहे असे विधान करत भाजपाने स्वत:ला पालिकेच्या कारभारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न कसा काय करु शकते असे मत सेनेच्याच एका नेत्याने व्यक्त केले. ३४ हजार कोटीचा अर्थसंकल्प आणि २५ हजार कोटींच्या बँक ठेवी असलेल्या महापालिकेत टॅक्स टेररीझम सुरू आहे ते बदलल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असे म्हणणे म्हणजे सत्तेचे फायदे घेऊन पुन्हा विरोधात बोलणे होत नाही का? असा सवालही त्या नेत्याने केला.