शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

डॉक्टर संपावर गेलेच कसे? - हायकोर्ट

By admin | Updated: July 14, 2015 01:21 IST

डॉक्टरांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने तीन वर्षांपूर्वीच दिले होते; तरीही विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टर संपावर

मुंबई : डॉक्टरांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने तीन वर्षांपूर्वीच दिले होते; तरीही विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टर संपावर गेलेच कसे, असा सवाल उपस्थित करीत उच्च न्यायालयाने राज्य शासनाला सोमवारी फटकारले. डॉक्टरांचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरल्याने याबाबत प्रतिज्ञापत्राद्वारे खुलासा करण्याचे आदेश न्यायालयाने शासनाला दिले.राज्यभरातील सुमारे ४ हजार निवासी डॉक्टर विविध मागण्यांसाठी जुलैच्या पहिल्याच आठवड्यात संपावर गेल होते. सरकारने मध्यस्थी केल्यानंतर दोन दिवसांनी डॉक्टरांनी संप मागे घेतला. या संपाविरोधात अ‍ॅड. दत्ता माने यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. डॉक्टरांच्या संपाचा भुर्दंड नागरिकांनी का सहन करायचा? डॉक्टर संपावर जाणार नाहीत याची काळजी घेण्याची आदेश न्यायालयाने तीन वर्षांपूर्वीच दिले होते. तरीदेखील डॉक्टर संपावर गेले, याचा अर्थ हा प्रश्न हाताळण्यात शासन यंत्रणा फोल ठरली आहे. त्यामुळे याचा खुलासा शासनाने प्रतिज्ञापत्राद्वारे करावा, असे आदेश देऊन न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली. (प्रतिनिधी)