शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

कसा होणार विकास; कशी मिळणार हगणदरीमुक्ती?

By admin | Updated: July 22, 2016 01:05 IST

‘आमचा गाव-आमचा विकास’ यासाठी जिल्हा परिषदेत आयोजित कार्यशाळेकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनीच पाठ फिरवली.

पुणे : ‘आमचा गाव-आमचा विकास’ यासाठी जिल्हा परिषदेत आयोजित कार्यशाळेकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनीच पाठ फिरवली. अवघे २० ते २५ लोकप्रतिनिधीच उपस्थित होते. ‘गर्दी’ नसल्याने उपहासाने ‘दर्दी’ उपस्थित असल्याचे निवेदकाला म्हणावे लागले. त्यामुळे लोकप्रतिनिधीच जर हे गांभीर्याने घेत नसतील, तर कसा होणार गावाचा विकास व कधी मिळणार हगणदरीमुक्ती, असा सवाल उपस्थित होतो. ग्रामपंचायतींना स्व-उत्पन्नाशिवाय आता १४व्या वित्त आयोगांतर्गत मोठा निधी मिळत आहे. या निधीतून गावांचा विकास करण्यासाठी ‘आमचा गाव-आमचा विकास’ अशी मोहीम शासनाने हाती घेतली असून, त्यासाठी पुढील ५ वर्षांचे आराखडे तयार करण्याचा सूचना प्रत्येक गावाला दिल्या आहेत. १५ आॅगस्टपर्यंत हे आराखडे तयार करून ग्रामसभेत मंजुरी घेऊन अंतिम करायचे आहेत. यासाठी जिल्हाभर ‘आमचा गाव-आमचा विकास’ या कार्यशाळा सुरू आहेत. पुणे जिल्ह्यातील १,४०७ ग्रामपंचातींना १४व्या वित्त आयोगांतर्गत सन २०१५-१६मध्ये एकूण ९५,६४,४२,७७५ रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषदप्रमुख, सर्व गटविकास अधिकारी व सहायक गटविकास अधिकारी यांचे क्षमता बांधणी व प्रशिक्षण कार्यक्रम करण्यात आले असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांची प्रशिक्षण कार्यशाळा गुरुवारी जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आली होती. सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशी ही कार्यशाळा होती. मात्र, सदस्यच उपलब्ध नसल्याने सकाळी कार्यशाळा घ्यायची तर कोणाची, असा प्रश्न आयोजकांसमोर उपस्थित झाला होता. काही लोक आल्याने ही र्कायाशाळा सुरू झाली. पहिल्या सत्रात काही काळ सदस्य उपस्थित राहिले व निघून गेले. दुसऱ्या सत्रात तर २०० लोकांची व्यवस्था केली असताना कशाबशा पहिल्या दोन रांगाही भरल्या नाहीत, अशी परिस्थिती होती़ (प्रतिनिधी)>गावाचे, जिल्ह्याचे जिथे योग्य नियोजन तेथे चांगला विकास होतो. त्यामुळे सर्वांनी नियोजनात पुढाकार घेणे गरजेचे आहे. आजच्या कार्यशाळेला मिळालेला प्रतिसाद पाहता मलाही खंत वाटते. माझी सर्वांना विनंती आहे की, आपण त्या गावाचे, गणाचे, गटाचे प्रमुख आहात. त्याच्या नियोजनात आपण सहभागी झाले पाहिजे. समजून घेतले पाहिजे. यासाठी वेळे दिला पाहिजे.- प्रदीप कंद, अध्यक्ष, जिल्हा परिषद