शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

...तर महाराष्ट्र पुरोगामी कसा?

By admin | Updated: February 21, 2015 22:44 IST

विवेकी व विज्ञानवादी समाजनिर्मितीसाठी लढणाऱ्यांच्या जेथे हत्या होतात, जिथे दर महिन्याला अंधश्रद्धेपोटी एक नरबळी दिला जातो तो महाराष्ट्र पुरोगामी कसा, असा सवाल मुक्ता दाभोलकर यांनी येथे केला.

शिरूर : विवेकी व विज्ञानवादी समाजनिर्मितीसाठी लढणाऱ्यांच्या जेथे हत्या होतात, जिथे दर महिन्याला अंधश्रद्धेपोटी एक नरबळी दिला जातो तो महाराष्ट्र पुरोगामी कसा, असा सवाल मुक्ता दाभोलकर यांनी येथे केला. येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित ‘स्व. धनराज नहार स्मृती व्याख्यानमाले’त दाभोलकर ‘अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची वाटचाल’ या विषयावर बोलत होत्या. तहसीलदार रघुनाथ पोटे अध्यक्षस्थानी होते. पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, माजी नगरसेवक संपतलाल नहार, राष्ट्रवादी युवकचे माजी शहराध्यक्ष संतोष मोरे, जीवन विकास मंदिरच्या मुख्याध्यापिका शकुंतला रसाळ आदी विचार मंचावर उपस्थित होते. दाभोलकर म्हणाल्या, ‘‘फुले, शाहू, आंबेडकरांची जी परंपरा आपण सांगतो त्या परंपरेतून लोकांच्या आयुष्याला भेडसावणारे प्रश्न विवेकी दृष्टिकोनातून हाताळण्याची एक समाजप्रबोधनाची सक्षम परंपरा महाराष्ट्रात रुजलेली आहे. या परंपरेचा विचार घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ उभी राहिली आहे. १९८९ ला सुरू झालेल्या या चळवळीतून गेल्या २५ वर्षांत अंधश्रद्धा पसरवणाऱ्या ७०० ते ८०० बुवा-बाबांचे धंदे बंद पाडण्यात चळवळीला यश आले आहे.’’ डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी जादूटोणा कायदा अमलात यावा, यासाठी १८ वर्षे लढा दिला. मात्र, हा कायदा विशिष्ट धर्माच्याविरोधात असल्याचा अपप्रचार केला गेला. या अपप्रचाराची मोठी किंमत डॉ. दाभोलकरांना मोजावी लागली. याची खंत मुक्ता दाभोलकरांनी व्यक्त केली. अंधश्रद्धा या विकासविरोधी असून, त्याला कडाडून विरोध केला पाहिजे, असे सांगून दाभोलकर म्हणाल्या, ‘‘श्रद्धा उन्नत व मानवकेंद्रित केली तर समाज बदलू शकेल व अंधश्रद्धा निर्मूलन होऊ शकेल.’’ जयंती उत्सव समितीचे प्रमुख रवींद्र धनक, घोडगंगा कारखान्याचे संचालक पांडुरंगअण्णा थोरात, क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे, समितीचे अ‍ॅड़ ओमप्रकाश सतिजा, विक्रम पाटील, सतीश गवारी, प्रा. दत्ता शिंदे, मंगेश खांडरे, संजय बांडे, अनिल बांडे, संजय कौठाळे, चाँदभाई बळबट्टी, रामा इंगळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. वजिफा शेख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. समाजमनात भीती असणे घातक ४समाजात विचार मांडणाऱ्यांच्या मनात भीतीची भावना निर्माण होणे ही गोष्ट लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. ही भावना नष्ट होण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांचे मारेकरी पकडले गेले पाहिजेत, अशी अपेक्षा मुक्ता दाभोलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. चार्ली हॅब्दोवर जो हल्ला झाला त्या हल्ल्यातील मारेकऱ्यांना त्या सरकारने ४८ तासांत जेरबंद केले. आपले सरकार मारेकरी पकडण्यात अपयशी ठरत असल्याची खंत दाभोलकरांनी व्यक्त केली. ४महाराष्ट्रातून कायदा व सुव्यवस्था आहे कुठे, असा प्रश्न करून दाभोलकर म्हणाल्या, ‘‘सरकारने डॉ. दाभोलकर व पानसरे यांचे मारेकरी पकडण्यात आता तरी तत्परता दाखवावी.’’