शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कसा होणार जिल्हा हगणदरीमुक्त?

By admin | Updated: June 28, 2016 00:54 IST

शासन हगणदरीमुक्त राज्य करण्यासाठी आग्रही असून, अतिक्रमित कुटुंबीयांनाही शौचालयासाठी अनुदान देण्यास तयार होत आहे.

पुणे : शासन हगणदरीमुक्त राज्य करण्यासाठी आग्रही असून, अतिक्रमित कुटुंबीयांनाही शौचालयासाठी अनुदान देण्यास तयार होत आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य आपला तालुका निर्मल करण्यास उत्सुक नसल्याचे मिळालेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. ७५ गटांपैकी २१ गटांत अद्याप ७0 टक्केही काम झाले नसून, इंदापूर तालुका सर्वांत मागे आहे. येथील एकाही सदस्यला आपला गट ६0 टक्केच्यावर हगणदरीमुक्त करता आला नाही. विशेष म्हणजे हा तालुका माजी जिल्हा परिषद अध्यक्षांचा असून तेथे आतापर्यंत सर्वाधिक योजनांचा लाभ मिळाला आहे. दरम्यान, १२ मे २0१६ रोजी राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून आपला जिल्हा यंदा हगणदरीमुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र जिल्ह्यात १४0६ ग्रामपंचायती असून, त्यापैैकी ३६१ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत. यात मुळशी तालुका हगणदारीमुक्त झाला असून, अद्याप १ हजार ५४ ग्रामपंचायती बाकी असून, १ लाख ३0 हजार कुटुंबीयांकडे शौैचालये नाहीत. ३१ मार्च २0१७ पर्यंत जिल्हा हगणदरीमक्त करण्याचे मोठे काम जिल्हा परिषद प्रशासनाला करावे लागणार आहे. मात्र लोकप्रतिनिधीच याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील मुळशी तालुका गेल्या वर्षी हगणदरीमुक्त झाला तो फक्त लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या पुढाकारामुळेच. लोकप्रतिनिधींनी जर मनावर घेतले तरच ते आपला तालुका, गट, गण निर्मल करू शकतील हे ताजे उदाहरण मुळशीचे आहे. जिल्हा परिषद सदस्यांच्या गटानुसार माहिती मिळवली असता धक्कादायक माहिती समोर आली. ७0 टक्केपर्यंतचे टार्गेट ७५ पैकी फक्त ५४ सदस्यांच्या गटात पूर्ण झाले असून, २१ गटातील सदस्य हे ७0 पेक्षा खाली आहेत. (प्रतिनिधी)>इंदापूरच्या एकाही गटात ५0 टक्के काम नाहीयात सर्वांत कमी इंदापूर तालुक्यातील बावडा लाखेवाडी गटातील श्रीमंत ढाले यांचा गट फक्त ३९.८४ टक्के हगणदरीमुक्त झाला आहे. त्यानंतर देवराज जाधव यांचा निमगाव केतकी निमसाखर ४१.६४६, कतुजा पाटील यांचा वडापूर काटी गट ४४.९६५ तर प्रताप पाटील यांचा वालचंदनगर कळस गट ४५.९ टक्केच निर्मल झाला आहे. या सदस्यांना आपला गट ५0 टक्केही निर्मल करता आला नाही. आंबेगाव ८५.८0, बारामती ७५.८१, भोर ९४.२६, दौंड ६८.३0, हवेली ९0.६९, इंदापूर ४७.६७, जुन्नर ८६.८१, खेड ८१.३२, मावळ ७२,६५, पुरंदर ७७.८९, शिरूर ७६.४३ व वेल्हे ९५.९१ टक्के हगणदरीमुक्त झाला आहे. भोर आणि वेल्हे लवकरच हगणदरीमुक्त होऊ शकतात.