शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांत मागदर्शक तत्त्वे कशी ठरणार?

By admin | Updated: September 3, 2016 01:29 IST

मुर्तींचे पावित्र्य कायम राखण्यासाठी विसर्जनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यासाठी सरकारला आदेश देण्याची मागणी एका जनहित याचिकेद्वारे शुक्रवारी करण्यात आली. मात्र अवघ्या कमी

मुंबई : मुर्तींचे पावित्र्य कायम राखण्यासाठी विसर्जनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यासाठी सरकारला आदेश देण्याची मागणी एका जनहित याचिकेद्वारे शुक्रवारी करण्यात आली. मात्र अवघ्या कमी अवधीत सरकार मार्गदर्शक तत्त्वे कशी ठरवणार, असे सांगत उच्च न्यायालयाने सरकारला आदेश देण्यास नकार दिला. विसर्जनानंतर गणपतीच्या मूर्ती पुन्हा समुद्र किनाऱ्यावरच वाहून येतात. त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावतात, असे याचिकाकर्ते अ‍ॅड. साक्षत रेळेकर यांनी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे सांगितले. २००८ मध्ये केंद्र सरकारने गणेश विसर्जन व निर्माल्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात मागदर्शक तत्त्वे आखली आहेत. मात्र ही मागदर्शक तत्त्वे प्रदूषण रोखण्यासाठी पुरेशी नाहीत. त्यामुळे राज्य सरकारला गणेश विसर्जन व निर्माल्याची विल्हेवाट लावण्यासाठी मागदर्शक तत्त्वे आखण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी रेळेकर यांनी केली. मात्र गणेशोत्सवाला चार दिवस राहिल्याने एवढ्या तत्काळ राज्य सरकारला आदेश देऊ शकत नसल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. पुढील वर्षासाठी सरकारला आदेश दिले जाऊ शकतात, असे म्हणत उच्च न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी अनंत चर्तुदशीनंतर ठेवली आहे. भाविकांनी पीओपीच्या मूर्ती न वापरता ‘इको-फ्रेंडली’ मूर्तींचे पूजन करावे. तसेच मूर्तींच्या रंगकामासाठी हानिकारक रंग वापरू नयेत, असे आवाहनही उच्च न्यायालयाने केले. (प्रतिनिधी)