शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची ध्वनिक्षेपकाला परवानगी कशी?

By admin | Updated: April 6, 2016 05:07 IST

ध्वनिप्रदूषण कायद्यांतर्गत शांतता क्षेत्रात ध्वनिक्षेपक लावण्यास मनाई असतानाही शिवाजी पार्क पोलिसांनी कायद्यातील तरतुदी बासनात गुंडाळत मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यादरम्यान

मुंबई : ध्वनिप्रदूषण कायद्यांतर्गत शांतता क्षेत्रात ध्वनिक्षेपक लावण्यास मनाई असतानाही शिवाजी पार्क पोलिसांनी कायद्यातील तरतुदी बासनात गुंडाळत मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यादरम्यान ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी दिली. कायद्यातील तरतुदीला डावलून गुढीपाडवा मेळाव्यात ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी दिलीच कशी? असा जाब पोलिसांना विचारत उच्च न्यायालयाने सरकारला बुधवारी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) गुढीपाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या वर्षी ८ एप्रिल रोजी मनसेतर्फे शिवाजी पार्कवर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेनेही मनसेला परवानगी दिली आहे. शिवाजी पार्क पोलिसांनीही मेळाव्यात ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी दिली. याबाबत वेकॉम ट्रस्टने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जावरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे होती. ‘मेळावा आयोजित करण्यासाठी आमचा आक्षेप नाही. मात्र या ठिकाणी ध्वनिक्षेपक लावण्यावर आमचा आक्षेप आहे. पोलिसांनी कायद्याचे उल्लंघन करून मेळाव्यादरम्यान ध्वनिक्षेपक लावण्यासाठी परवानगी दिली आहे,’ असे वेकॉमने उच्च न्यायालयाल सांगितले.त्यावर मनसे व आमदार नितीन सरदेसाई यांच्या वतीने ज्येष्ठ वकील व्ही. थोरात आणि गिरीश गोडबोले यांनी कायद्यातील अट शिथिल केली जाऊ शकते, असे खंडपीठाला सांगितले. ध्वनिप्रदूषण कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन होणार नाही, अशी हमी देणार का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने मनसेकडे केली. त्यावर अ‍ॅड. थोरात म्हणाले, ‘अशी हमी न देण्याच्या सूचना मला देण्यात आल्या आहेत. कायद्याचे उल्लंघन केल्यास सरकार कारवाई करेल,’ असे अ‍ॅड. थोरात यांनी खंडपीठाला म्हटले.मात्र यावर खंडपीठाने असमाधान व्यक्त केले. ‘कायद्याचे पालन करण्यासाठी सगळे बांधील आहेत. हमी देण्यास हरकत नाही,’ असे म्हणत खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी बुधवारी ठेवली आहे. (प्रतिनिधी)