शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गृहनिर्माण नियमन आॅगस्टपासून प्रभावी

By admin | Updated: July 26, 2015 04:18 IST

शिक्षण, बँकिंग व फायनान्स, रिअल इस्टेट क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना वांद्रे येथील ताज लॅन्डस एन्ड हॉटेलमध्ये ‘लोकमत नॅशनल एक्सिलन्स अ‍ॅवॉर्ड’ सोहळ्यात शुक्रवारी

‘लोकमत’चा पुरस्कार सोहळा : मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणामुंबई : गृहनिर्माण क्षेत्रात पारदर्शकता यावी, सातत्यपूर्ण विकास साधला जावा, त्याचवेळी नियम धाब्यावर बसविणाऱ्यांना चाप बसावा यासाठी गृहनिर्माण नियमन कायद्याची आॅगस्टमध्ये प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.शिक्षण, बँकिंग व फायनान्स, रिअल इस्टेट क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना वांद्रे येथील ताज लॅन्डस एन्ड हॉटेलमध्ये ‘लोकमत नॅशनल एक्सिलन्स अ‍ॅवॉर्ड’ सोहळ्यात शुक्रवारी गौरविण्यात आले. या वेळी ‘लोकमत’चे संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी स्वागतपर भाषणात अधोरेखित केलेल्या गृहनिर्माण कायद्याच्या मुद्द्याला मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात हात घातला.फडणवीस यांचे स्वागत करत दर्डा म्हणाले, आजघडीला गृहनिर्माण क्षेत्रात म्हणजेच बांधकाम क्षेत्रात लोक मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. राष्ट्रीय अथवा राज्य पातळीवरील बांधकाम क्षेत्राकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. सद्य:स्थितीत या क्षेत्रातील गुंतवणूक कोट्यवधींच्या घरात आहे. असे असतानादेखील बांधकाम क्षेत्र लोकांच्या गरजा पूर्ण करत नाही. या क्षेत्रातील प्रश्न चुटकीसरशी सुटत नाहीत. बांधकाम क्षेत्रात पर्यावरणीय मंजुरी मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय इतर अनेक अडथळे असतात. यासाठी गृहनिर्माण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली तर बांधकाम क्षेत्रातील पारदर्शकता वाढेल, कामात सातत्य आणि नियमितता येईल, अशी अपेक्षाही दर्डा यांनी या वेळी व्यक्त केली.फन अ‍ॅण्ड जॉयचे संचालक डॉ. आर.एल. भाटिया यांनी या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. तर मोहन ग्रुप या सोहळ्याचे टायटल स्पॉन्सर, सिद्धीटेक ग्रुप को-स्पॉन्सर, टीजेएसबी बँक बँकिंग पार्टनर आणि टॉपलाइन कन्स्ट्रक्शन कंपनी असोसिएट स्पॉन्सर होते. याप्रसंगी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर, साहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला आणि कार्यकारी संपादक (मुंबई) विनायक पात्रुडकर आदी मान्यवर उपस्थित होते. तर दुपारी झालेल्या सोहळ्याला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ एस. एस. झेंडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२पर्यंत सर्वांना घराचे स्वप्न बाळगले आहे. त्याला साद देत राज्याचे गृहनिर्माण क्षेत्र वाटचाल करेल. ते केवळ संपन्न लोकांसाठी नसेल तर ‘लोकमत’ ज्या सामान्य वाचकांचे अनेक वर्षे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करीत आहे अशा सामान्य माणसांसाठी ते असेल. आज म्हाडा अन् एसआरएच कॉमन मॅनसाठी घरे बांधतात. बांधकाम क्षेत्रातील लोकांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. गृहनिर्माण प्रकल्प लालफीतशाहीमध्ये आणि भ्रष्टाचारात अडकणार नाहीत याची मी ग्वाही देतो. गृहनिर्माण क्षेत्रासाठी स्वतंत्र कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल. राज्यात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यास आपले सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.सर्वसामान्यांची कामे निश्चित कालावधीत होणारउद्योगांच्या उभारणीला परवानग्यांपायी होणारा विलंब टाळला जाईल. त्यासाठीची निश्चित योजना तयार करण्यात आली असून, त्याचे परिणाम लवकरच दिसतील. मोठ्या हॉटेल्ससाठी लागणारे १४८ परवाने २० वर आणले जात आहेत. सेवा हमी कायद्याने सरकार दरबारी सामान्यांची कामे निश्चित कालावधीत होतील. त्यासाठी आम्ही कायदा केला आहे. नवी मुंबईतील नयना प्रकल्पा अंतर्गत ३० स्मार्ट शहरे वसविण्यात येणार आहेत. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री