शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जादुटोण्यातून मारहाण झाल्याने अपमानित महिलेची आत्महत्या, सहा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2016 19:48 IST

गावात तुम्ही जादुटोणा करता असा आरोप करीत जबर मारहाण व अपमानित झालेल्या राजोली येथील एका दाम्पत्यापैकी महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

सहा जणांना अटक : राजोलीतील गावकऱ्यांचा पोलिसांवर रोषकेशोरी (गोंदिया) : गावात तुम्ही जादुटोणा करता असा आरोप करीत जबर मारहाण व अपमानित झालेल्या राजोली येथील एका दाम्पत्यापैकी महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी गावात तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी गहाणे कुटुंबियातील ६ लोकांना अटक केली तर एक जण फरार आहे. यामुळे गावातील तणावपूर्ण वातावरण शांत झाले. मात्र याप्रकरणी पोलिसांनी सुरूवातीला असहकार्याची भूमिका घेतल्याने नागरिकांनी त्यांच्यावर चांगलाच रोष व्यक्त केला.

प्राप्त माहितीनुसार, केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या राजोली येथील सुभद्रा (४०) आणि गुरूदेव उईके (४५) हे दाम्पत्य गावात जादुटोणा करीत असल्याचा संशय घेऊन गहाणे कुटुंबातील लोकांनी त्यांना दि.१९ ला मारहाण केली. याची तक्रार देण्यासाठी हे दाम्पत्य राजोली सशस्त्र दूरक्षेत्र चौकीवर गेले असता त्यांना तेथील शिपायाने केशोरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. दि.२० ला उईके दाम्पत्य केशोरी ठाण्यात गेले. मात्र तेथील कर्मचाऱ्याने त्यांच्याशी उद्धट वागून त्यांनाच दमदाटी केली. एवढेच नाही तर त्यांना उलटसुलट प्रश्न विचारून तेथून केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.

घरी परतल्यानंतर दि.२१ व २२ ला पुन्हा गहाणे परिवारातील सदस्यांकडून उईके यांना पोलिसात तक्रार केली म्हणून दमदाटी झाली. यामुळे प्रचंड तणावात असलेल्या या दाम्पत्याने दि.२३ ला गावातच असलेल्या सुभद्राच्या भावाकडे आश्रय घेतला. मात्र सततच्या अपमानाने अस्वस्थ झालेल्या सुभद्राने दि.२४ च्या पहाटे घरून बाहेर पडून एका विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली.इकडे ती अचानक गायब झाल्याने सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. पोलिसांना कळविण्यात आले. मात्र यावेळीही पोलिसांनी गहाणे कुटुंबियांच्या दबावात येऊन कोणतीही चौकशी केली नाही, असा नातेवाईकांचा आरोप आहे.

दरम्यान संशय आल्याने विहिरींमध्येही शोध घेतला असता एका विहिरीत गाळाला सुभद्राचा मृतदेह लागला. यामुळे गावकऱ्यांचा रोष आणखीच वाढला. जोपर्यंत या प्रकरणातील आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही, अशी भूमिका गावकरी व नातेवाईकांनी केली.

वाढत चाललेला तणाव व आणि गावकऱ्यांचा रोष पाहून अखेर केशोरी पोलिसांनी या प्रकरणी भादंविच्या कलम ३०६, ४५२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४, अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच या प्रकरणात महिलेचा छळ केल्याप्रकरणी आरोपी मंगेश गहाणे, महेश गहाणे, डॉ.सत्तू गहाणे, भरत गहाणे, रतिराम गहाणे व श्यामराव गहाणे यांचे जावई पुरूषोत्तम तुकाराम बावनथडे रा.सोनारंजी (जि.गडचिरोली) यांना अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी फरार आहे.