शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
3
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
4
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
5
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
6
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
7
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
8
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
9
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
10
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
11
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
12
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
13
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
14
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
15
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
16
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
17
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
18
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
19
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
20
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव

दोन बायकांची हौस पुरविण्यासाठी नवरा बनला घरफोड्या...

By admin | Updated: December 26, 2015 09:03 IST

दोन बायकांची हौस पुरविण्यासाठी एका नवऱ्यावर घरफोड्या बनण्याची वेळ ओढावल्याची घटना दादर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीतून समोर आली. अनंत पांडुरंग

- मनीषा म्हात्रे,  मुंबई

दोन बायकांची हौस पुरविण्यासाठी एका नवऱ्यावर घरफोड्या बनण्याची वेळ ओढावल्याची घटना दादर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीतून समोर आली. अनंत पांडुरंग भालेकर (४५) असे या ‘पराक्रमी’ नवऱ्याचे नाव असून त्याच्याकडून तब्बल सात घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली. मुंबईसह रायगड, ओरिसामध्ये त्याने धुमाकूळ घातला होता. वरळी कोळीवाडा परिसरात भालेकर राहण्यास असून बिगारीचे काम करतो. काही वर्षांपूर्वी कुटुंबियांच्या संमतीने त्याचा लक्ष्मी (नावात बदल) सोबत विवाह झाला. बिगारीचे काम करत असताना त्याचा रेश्मावर (नावात बदल) जीव जडला. तिच्या आधुनिक राहणीमानामुळे तिच्याशी दुसरा विवाह करुन तिला दादर परिसरात भाड्याच्या घरात ठेवले. लक्ष्मीकडून दोन तर रेश्माकडून त्याला तीन मुले झाले. एकीकडे घरखर्चासाठी पत्नीची किटकिट तर दुसरीकडे महागड्या वस्तुंसाठी रेश्माचा सुरु असलेला अट्टाहास भागवायचा कसा? असा प्रश्न त्याच्यासमोर होता. दोन बायकांची हौस भागविण्यासाठी पैसा अपुरा पडू लागल्याने सुरुवातीला तो छोट्या चोऱ्या करु लागला. त्यापाठोपाठ त्याने घरफोडी करणे सुरु केले. बिगारीचे काम करत असताना तो परिसरातील बंद घरांची रेकी करायचा. मध्यरात्रीच्या सुमारास जाऊन घरफोडी करुन तो पळ काढत असे. मिळालेल्या पैशातून तो दोन्ही पत्नींची हौस भागवण्याचे काम करत होता. तो बिगारी काम करत असल्याने त्याच्या दोन्ही बायकांना दोन लग्नाबाबत थांगपत्ताच नव्हता. मुंबईसह रायगड, ओरिसा या भागातही बिगारी कामासाठी गेला असताना त्याने घरफोड्या करुन पोलिसांच्या नाकीनऊ आणले होते. दादर परिसरातील वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे वरिष्ठ निरीक्षक निशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय दीपाली कुलकर्णी यांच्या तपास पथकाने अधिक शोध सुरु केला. त्यांच्या तपास पथकामध्ये पीएसआय संभाजी खामकर, अंमलदार पाटील, सागर तांबकट, उज्ज्वल सावंत, गुलाबराव फापाळे आणि राठोड यांचा समावेश होता. भालेकर दादरमध्ये घरफोडीसाठी येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार, सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. मुद्देमाल जप्त करण्यासाठी तपास पथकाने वरळी येथील घराची झडती घेतली. त्यामध्ये हाती काहीच लागल्यानंतर भालेकरने दादर येथेही भाड्याने खोली घेतल्याची माहिती मिळाली. तेथे गेल्यानंतर तपास पथकाला भालेकरची दुसरी बायको दिसून आली. तिच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत ही बाब उघड झाल्याने पोलिसही चक्रावले. हौस भागविण्यासाठी आरोपी कुठल्या थराला पोहोचू शकतात, याचा प्रत्यय भालेकरच्या प्रतापातून समोर आला.