शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

घरे महागणार!

By admin | Updated: April 2, 2017 06:43 IST

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने वाढविलेले रेडीरेकनरचे दर शनिवारपासून लागू झाल्याने राज्यातील घरांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.

पुणे : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने वाढविलेले रेडीरेकनरचे दर शनिवारपासून लागू झाल्याने राज्यातील घरांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. रेडीरेकनरच्या दरात सरासरी ५.८६ टक्क्यांची वाढ झाली आहे. सर्वाधिक ९.८२ टक्क्यांची वाढ अहमदरनगरमध्ये तर सर्वात कमी १.५० टक्के वाढ नागपूरमध्ये करण्यात आली आहे. पुणे महापालिका क्षेत्रासाठी ३.६४ तर पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रासाठी ४.४६ टक्के वाढ करण्यात आली असून पुणे ग्रामीण क्षेत्रात १५.३ टक्के वाढ झाली आहे. जिल्ह्याची सरासरी वाढ ८.६० टक्के आहे. त्यामुळे शहरालगतच्या तसेच ग्रामीण भागातील मोक्याच्या जागांच्या किमती वाढणार असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी रेडीरेकनरच्या दरात सात टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. सध्या जमीन खरेदी विक्रीच्या आणि बांधकाम क्षेत्रात असलेली मंदीसोबतच नोटाबंदीचा बसलेला फटका याचा अभ्यास करुन ५.८६ टक्क्यांची वाढ सुचविण्यात आली. राज्यातील ग्रामीण क्षेत्रातील ४१ हजार ६७८ गावांमध्ये ७.१३ टक्के, तर प्रभाव क्षेत्रातील १ हजार ७८८ गावांमध्ये ६.१२ टक्के वाढ करण्यात आली आहे. तर २७ महापालिका क्षेत्रांमध्ये सरासरी ४.७४ टक्क्यांची वाढ झाली असल्याने शहरी व निमशहरी भागात मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार वाढणार आहेत. महापालिका क्षेत्रांचे चित्र पाहता सर्वाधिक वाढ अहमदनगरमध्ये तर त्या खालोखाल जळगाव (९.४५), नाशिक (९.३५) टक्के अशी वाढ झालेली आहे. नाशिकचा विकास आराखडा नुकताच मंजूर झाल्याने शेती झोनमधील जमिनी निवासी झोनमध्ये आल्या आहेत. त्यामुळे ही वाढ दिसून येत असल्याचे नोंदणी महानिरीक्षक डॉ. एन. रामस्वामी यांनी सांगितले. नवी मुंबईमध्ये झालेल्या कृत्रिम दरवाढीमुळे दर फुगवटा तयार झाला आहे. हा फुगवटा कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. नवी मुंबई (१.६७), बृहन्मुंबई (३.९५), ठाणे (३.१८), मिरा भाइंदर (२.६६), कल्याण डोंबिवली (२.५६) उल्हासनगर (२.८८), भिवंडी निजामपूर (१.७१), वसई-विरार (२.०३), पनवेल (३.१७) अशी वाढ करण्यात आली आहे. मुंबई विभागाची एकूण वाढ ३.९५ टक्के झाली असून मागील वर्षी ही वाढ सात टक्के होती. पुणे विभागातील कोल्हापूर (३), सोलापूर (६.३०), सांगली-मिरज-कुपवाड (४.७०) अशी वाढ करण्यात आली असून पुणे विभागात एकूण ८.५० टक्के वाढ झाली होती. गेल्या वर्षी ही वाढ ११ टक्के होती. विभागनिहाय सर्वाधिक वाढ नाशिकमध्ये (९.२०) झाली असून द्वितीय क्रमांकावर पुणे (८.५०) आहे. त्यानंतर अमरावती (६.३०), औरंगाबाद (६.२०), कोकण (४.६९), मुंबई (३.९५) अशी वाढ आहे. तर सर्वात कमी नागपूरमध्ये २.२० टक्के वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)