शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

झोपड्यांवरील कारवाई गृहनिर्माणमंत्र्यांनीच रोखली

By admin | Updated: April 27, 2017 02:17 IST

तानसा पाइपलाइनजवळील झोपड्या हटवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र विद्याविहार येथील झोपडपट्ट्या न हटवण्यासाठी

मुंबई : तानसा पाइपलाइनजवळील झोपड्या हटवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र विद्याविहार येथील झोपडपट्ट्या न हटवण्यासाठी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी पोलिसांवर दबाव आणल्याची माहिती बुधवारी मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला दिली. उच्च न्यायालयाने यासंदर्भात टिळकनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पोलीस डायरीसह गुरुवारी न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.तानसा पाइपलाइनजवळील १० मीटर परिसरातील झोपडपट्ट्या हटवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला काही वर्षांपूर्वी दिला आहे. प्रत्येक टप्प्यासाठी कालावधी नेमून दिला आहे. दुसऱ्या टप्प्यातील काम डिसेंबर २०१६ला संपवणे अपेक्षित होते. मात्र महापालिका हे काम पूर्ण न करू शकल्याने महापालिकेने मुदतवाढीसाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठापुढे झाली. ठरलेल्या दिवशी महापालिकेचे अधिकारी झोपडपट्ट्या हटवण्यासाठी गेले होते. टिळकनगर पोलीस ठाण्यात संरक्षण मागण्यासाठी गेले असता तेथे प्रकाश मेहता बसले होते. त्या वेळी झोपडपट्टीधारकांचे कुर्ला एचडीआयल येथे पुनर्वसन केल्याशिवाय झोपडपट्ट्या तोडायच्या नाहीत, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कोणतेही कारण न देता पोलीस संरक्षण देण्यास नकार दिला. सतत पाच दिवस पोलिसांनी पोलीस संरक्षण देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे महापालिका भटवाडी येथील झोपडपट्ट्या हटवू शकली नाही, असे जोगळेकर यांनी खंडपीठाला सांगितले. (प्रतिनिधी)‘कामात अडथळा नको’-महापालिकेतर्फे अ‍ॅड. गीता जोगळेकर यांनी ‘राजकीय हस्तक्षेपामुळे आम्ही झोपडपट्ट्या हटवू शकत नाही,’ असे खंडपीठाला सांगितले. अशा मोहिमेत मंत्र्यांनी हस्तक्षेप करणे योग्य नाही. नेत्यांनी महापालिकेच्या कामात अडथळा आणू नये, असे म्हणत खंडपीठाने महाअधिवक्त्यांना गुरुवारच्या सुनावणीत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.