शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

गतिमंद तरूणीवर घरगड्याचा बलात्कार

By admin | Updated: July 17, 2014 02:36 IST

एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या गतिमंद मुलीवर घरगड्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पश्चिम उपनगरात घडली.

मुंबई : एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या गतिमंद मुलीवर घरगड्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पश्चिम उपनगरात घडली. आई-वडील दोघेही व्यवसायाच्या व्यापात अत्यंत व्यग्र असल्यामुळे दिवसभर घराबाहेर असत. त्यामुळे विश्वासाने त्यांनी आपल्या गतिमंद मुलीची देखभाल करण्यासाठी घरगड्याला नेमले होते. मात्र मालक सतत घराबाहेर असल्याची संधी साधत त्यानेच त्यांचा विश्वासघात केला.बाबूलाल डोडीयार (२४) असे या नराधम घरगड्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला मध्यरात्री अडीचच्या सुमारास अटक केली. न्यायालयाने त्याला २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १९ वर्षांच्या या गतिमंद तरुणीवर नायर रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते. तसेच ती शिकवणीला जात असे. तेथील शिक्षकांना या मुलीने बाबूलालचे कारनामे तुटक तुटक सांगितले. शिक्षकांनी ही बाब तात्काळ व्यावसायिक पालकांच्या कानावर घातले. हा प्रकार ऐकून चिंतेत पडलेल्या पालकांनी घरी मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने मुलीकडे चौकशी केली. त्यात तिने बाबूलालने बलात्कार केल्याचे स्पष्ट सांगितले. त्यानंतर पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार बाबूलालला गजाआड करण्यात आले. दरम्यान, जेजे रूग्णालयात मुलीच्या वैद्यकीय चाचण्या पार पडल्या असून डॉक्टरांचा अहवाल प्राप्त झालेला नाही, असे पोलीस उपायुक्त बालसिंग राजपूत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)