शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

घराचे माळवद कोसळून चौघे जखमी

By admin | Updated: July 11, 2016 21:55 IST

पवारवाडी (महदू, ता.सांगोला) येथील एका घराचे माळवद कोसळून त्याखाली घरातील चौघे गाढले गेले

ऑनलाइन लोकमत

सांगोला, दि. 11- पवारवाडी (महदू, ता.सांगोला) येथील एका घराचे माळवद कोसळून त्याखाली घरातील चौघे गाढले गेले मात्र शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांनी तातडीने गाढले गेलेल्यांना बाहेर काढले गेले. चौघेही जखमी झाले असले तरी त्यांच्या सुदैवाने जीवावर बेतले नाही.ही घटना रविवारी रात्रौ ११ च्या सुमारास घडली. हणमंत दत्तात्रय पवार (वय३१), अश्विनी हणमंत पवार(वय२५), विक्रांत हणमंत पवार( वय ७) आदित्य हणमंत पवार (वय ५ सर्वजण रा.सर्वजण पवारवाडी, महूद बु॥ता. सांगोला) अशी जखमींची नावे आहेत. त्यातील हणमंत दत्तात्रय पवार व विक्रांत हणमंत पवार यांना मोठा मार लागला असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पवारवाडी, येथे दत्तात्रय तायाप्पा पवार यांचे राहते घर असून रविवारी रात्रौ ८ वा.च्या सुमारास पवार कुटूंबीयांनी एकत्रित जेवण केले. यावेळी वडील दत्तात्रय पवार एका माळीत तर मुलगा हणमंत पवार पत्नी-दोन मुलांसह शेजारच्या खोलीत झोपले होते. दरम्यान रात्रौ ११ वा.च्या सुमारास अचानक अंगावर माळवद कोसळल्यानंतर आतून आरडा-ओरडण्याचा आवाज येवू लागल्याने वडील दत्तात्रय पवार जागे झाले असता आपल्या मुलाच्या अंगावर माळवद पडल्याचे पाहून मदतीसाठी शेजाऱ्यांना बोलावले. यावेळी माधव बाड, बाबासो पवार, शंकर पवार, वैभव आटपाडकर, नाथा नरळे आदी ग्रामस्थांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दत्तात्रय पवार, अश्विनी पवार, विक्रांत व आदित्य च्या अंगावरील माती, खांडे-दांडे, साहित्य बाजूला काढून त्यांना बाहेर काढले. यामध्ये हणमंत पवार यांचा हात फ्रॅक्चर झाला तर विक्रांतच्या डोक्याला मार लागून जखमी झाला. यावेळी दत्तात्रय पवार यांनी वेळ आली होती पण काळ आला नव्हता असे म्हणून देवाचे आभार मानले. अभिमान पवार यांनी सदर घटनेची माहिती गाव कामगार तलाठी यांना कळवूनही त्यांनी याकडे पाठ फिरवल्यामुळे पवार कुटूंबीयांकडून संताप व्यक्त होत आहे.