शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोटाची खळगी भरण्यासाठी सोडले घरदार

By admin | Updated: April 29, 2016 01:46 IST

राज्यातील बहुतांश भागात दुष्काळाने जनजीवन विस्कळीत झाले असून, पाण्याअभावी शेकडो एकर शेती पडीक पडली आहे

राजेगाव : राज्यातील बहुतांश भागात दुष्काळाने जनजीवन विस्कळीत झाले असून, पाण्याअभावी शेकडो एकर शेती पडीक पडली आहे. काही भागात हातची पिके जळून गेल्यामुळे शेतकऱ्यापुढे कुटुंबाच्या रोजीरोटीचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आ वासून उभारला आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे लहानाची मोठी केलेली चारा व पाणी न मिळाल्याने जनावरे मरणासन्न झाली आहेत. काही भागात जनावरे डोळ्यांदेखत मरण्यापेक्षा रामभरोसे वाऱ्यावर सोडून दिलेली आहेत. शेतीच पडीक पडल्याने मजुरांना शेतात कामधंदा मिळत नाही तसेच गावच्या आसपास रोजगारही उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांचे लोंढे दोन वेळच्या भाकरीसाठी शहराकडे निघाले आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी घरंदारं, नातीगोती सोडून काळजावर दगड ठेवून जड अंतकरणाने त्याने आपले चंबूगबाळ आवरून शहराची वाट धरू लागला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीच नसल्याने स्वत:चे राहते घर, बागायती अथवा जिरायती जमीन सोडून शहराचा आसऱ्यास जाऊन मिळेल ते काम करण्याची वाईट वेळ या दुष्काळग्रस्तांवर आली आहे. काही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडला आहे. आई-बापाबरोबर मुलेही दुष्काळी भागातील शाळा सोडून शहरात जाऊन छोटे-मोठे काम करत संसाराला आधार देऊ लागली आहेत. मुले जोपर्यंत लहान आहेत आणि हाताखाली येत नाहीत तोपर्यंत दुष्काळाने घाला घालून थकलेल्या वयातही मिळेल ते काम करून पोट भरण्याची वाईट वेळ आली आहे. मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती भयानक असल्याने या भागातील नागरिकांनी पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई या शहरांचा रस्ता धरला आहे. अशीच परिस्थिती दौंड तालक्यातील काही गावांची आहे. स्वत:चे हक्काचे घर जमीन सोडून आलो याचे दु:ख वाटते. पण पाणी नसेल तर त्या जमिनीकडे पाहून तरी काय करणार. गावातदेखील दुष्काळामुळे कामधंदे बंद पडल्यामुळे हाताला काम मिळत नाही. मोलमजुरी करून पोट भरावे तर तेही नाही. यामुळे नाईलाजास्तव गाव सोडावे लागले आहे. पण येथे काहीतरी कामधंदा मिळतो. कसेतरी दिवस काढू शकतो. >एका कुटुंबाला याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की , दुष्काळामुळे गावाकडे शेतीत पीकपाणी नाही. रोजच्या खाण्याचा प्रश्न निर्माण झाला. मुलाला पुढचे शिक्षण घेता येईना. गावात पाण्याचा थेंब नाही. मैलोन्मैल चालत जाऊन पाणी आणावे लागते. अर्धा दिवस पाणी आणण्यातच जातो. पाणी आहे तर माणूस, नाही तर काही नाही. एक वेळ दिवसातून एकदा जेवण दिले तरी चालेल पण प्यायला पाणी हे पाहिजेच. पाण्याअभावीचे जीवन आम्ही अनुभवले आहे. दुष्काळामुळे पोट भरण्यासाठी नाईलाजाने आम्ही या भागाच्या आश्रयास आलो.दुष्काळामुळे गावची गावे ओस पडली आहेत. गावातले सगळेच पोटापाण्यासाठी शहराचा रस्ता धरायला लागले आहेत. घरातील पुरुष मंडळी मोलमजुरी तर महिला घरकाम करून रोजची भाकरीची सोय करीत आहेत. शहरात हाताला काम मिळते म्हणून घरादाराच्या पोटापाण्याची सोय होत आहे. गावाला धरून बसलो तर दुष्काळाने पाण्यावाचून तडफडून मरायची वेळ आली असती. त्यामुळे गाव सोेडण्याचा निर्णय घेतला.