शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर डॉक्टरांशिवाय रुग्णालये

By admin | Updated: February 9, 2015 05:46 IST

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात व ग्रामीण भागांत बरीच रुग्णालये मान्यताप्राप्त पदवीधर डॉक्टरांशिवाय चालत असल्याने रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झाला

पंढरीनाथ कुंभार, भिवंडीभिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात व ग्रामीण भागांत बरीच रुग्णालये मान्यताप्राप्त पदवीधर डॉक्टरांशिवाय चालत असल्याने रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याबाबत आरोग्य सेवा मुंबई व शासनाच्या आरोग्य विभागाकडून शहर व ग्रामीण रुग्णालयांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. भिवंडी शहर व ग्रामीण भागांत मोठ्या संख्येने कामगारवर्गाचे वास्तव्य आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाच्या उदासीनतेचे दुष्परिणाम रहिवाशांना सोसावे लागतात. एक खासदार, दोन आमदार व ९० नगरसेवक असताना महापालिकेचे स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय शासनाकडे सोपवून स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात सर्व राजकीय पुढाऱ्यांनी धन्यता मानली आहे. मात्र, मनपास ग्रामीण आरोग्य सेवेप्रमाणे नागरी आरोग्य केंद्र शहरात सुरू करता आले नाही. या स्थितीचा गैरफायदा घेत शहरात मोठमोठी रुग्णालये उभी राहिली आहेत. मात्र, बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये एमबीबीएस, एमडी, सर्जन असे डॉक्टर नसून होमिओपथी, आयुर्वेदिक व इलेक्ट्रोपथी डॉक्टर बिनधास्तपणे अ‍ॅलिओपथीचे उपचार करत आहेत. उपचार करताना रुग्णाची प्रकृती हाताबाहेर गेली की, असे डॉक्टर रुग्णास मुंबईस नेण्याचा सल्ला देतात. योग्य वेळी आवश्यक उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावतो,अशा घटना बऱ्याचवेळा घडतात. मात्र, बहुसंख्य कामगार व रहिवासी परप्रांतीय असल्याने अशा घटनांना वाचा फुटत नाही. काही वेळा रुग्णाच्या नातेवाइकांवर दबाव आणून अशी प्रकरणे परस्पर निकाली काढली जातात.महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत गेल्या दोन वर्षांपासून शहरातील रुग्णालये, खाजगी दवाखाने व रक्त, लघवी तपासणी प्रयोगशाळेची नोंदणी पूर्ण झालेली नाही. आरोग्य विभागाच्या या दुर्लक्षामुळे रहिवाशांच्या जीवास धोका आहे. महापालिकेकडून सध्या बीजीपी दवाखाना या एकमेव ठिकाणी उपचार केले जातात. पालिकेच्या इतर १४ केंद्रांत बा'रुग्ण विभाग सुरू नसल्याने खासगी दवाखान्यांत जावे लागते.