शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

दोन जागांवर अडले सहमतीचे घोडे!

By admin | Updated: December 1, 2015 04:22 IST

विधान परिषदेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असला तरी सोलापूर आणि अहमदनगर या दोन जागांवर एकमत होऊ शकले नाही. काँगे्रसने पाच जागांचा

- अतुल कुलकर्णी,  मुंबईविधान परिषदेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असला तरी सोलापूर आणि अहमदनगर या दोन जागांवर एकमत होऊ शकले नाही. काँगे्रसने पाच जागांचा आग्रह धरल्यामुळे सोमवारची बैठक निष्फळ ठरली. आता २ डिसेंबर रोजी पुन्हा बैठक होणार आहे.विधान परिषद निवडणुकीचे जागा वाटप करण्यासाठी आज दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर पक्षीय बलाबल बदलले आहे. काँग्रेसची ताकद वाढली आहे, असा सूर लावत काँग्रेसने सोलापूर, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, नगर आणि मुंबई या पाच जागांवर दावा केला. अहमदनगरची जागा अपक्ष म्हणून गेल्या वेळी लढवली गेल्याने व आता नगरमध्ये आपली ताकद जास्त असल्याचे सांगत काँग्रेसने नगरवर ताबा सांगितला. नागपूर आणि अकोला-बुलढाणा राष्ट्रवादीने घ्यावे, असा प्रस्ताव काँग्रेसने त्यांच्यापुढे ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. नागपूरमध्ये भाजपाचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे ती जागा काँग्रेस जिंकू शकत नाही म्हणून ती राष्ट्रवादीला देण्याचे घाटत आहे. तर बुलडाणा-वाशिम अवघ्या चार मतांनी आम्ही हरलो तेव्हा ती जागा आम्हाला द्या, असा आग्रह राष्ट्रवादीचा आहे. अशा आहेत जागा१ जानेवारी रोजी विधान परिषदेच्या ८ जागा रिक्त होणार आहेत. त्यात मुंबईतून भाई जगताप, धुळे-नंदुरबारहून अमरिश पटेल, कोल्हापूरहून महादेव महाडिक आणि नागपूरहून राजेंद्र मुळक असे चौघे काँग्रेसतर्फे निवडून आले होते; तर दीपक साळुंके सोलापूरहून राष्ट्रवादीतर्फे विजयी झाले होते. अहमदनगरहून अरुणकाका जगताप अपक्ष म्हणून निवडून आले; पण नंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. रामदास कदम शिवसेनेतर्फे मुंबईतून निवडून आले होते; तर अकोला- बुलडाणा-वाशिममधून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया निवडून आले होते.मुंबईत काँग्रेसचे संख्याबळ ७४ आहे. पहिल्या पसंतीची मते मिळवून जिंकून येण्यासाठी ७६ मतांची गरज आहे. त्यामुळे मुंबईतही काँग्रेसने नारायण राणे यांचे नाव पुढे करावे, असा काँग्रेसमधील एका गटाचा आग्रह आहे.