शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘घाऱ्या’,‘पोटल्या’मुळे खळबळ

By admin | Updated: February 16, 2016 03:41 IST

येथील आत्महत्या केलेले बिल्डर सूरज परमार आणि त्यांचे स्नेही वल्लभ मजेठिया यांच्यातील संवादात ‘घाऱ्या’ (राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड) आणि ‘पोटल्या’ यांचाही त्रास देणारे म्हणून उल्लेख केला गेला

ठाणे : येथील आत्महत्या केलेले बिल्डर सूरज परमार आणि त्यांचे स्नेही वल्लभ मजेठिया यांच्यातील संवादात ‘घाऱ्या’ (राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड) आणि ‘पोटल्या’ यांचाही त्रास देणारे म्हणून उल्लेख केला गेला होता, असा सनसनाटी दावा विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी सोमवारी न्यायालयात केला.परमार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या जामिनास विरोध करताना, ठाकरे यांनी मजेठिया यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत ‘घाऱ्या’ आणि ‘पोटल्या’ यांचा उल्लेख असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे, तर ‘घाऱ्या’ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड व ‘पोटल्या’ म्हणजे शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के असे स्वत: मजेठिया यांनीच जबानी देताना स्पष्ट केले होते, असेही ठाकरे यांनी नमूद केले. त्यामुळे या आत्महत्या प्रकरणात अडकलेल्या चार नगरसेवकांबरोबर या दोन बड्या नेत्यांच्या नावांचा जाहीर उल्लेख झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.मजेठिया यांच्या जबानीचा संदर्भ देत, अ‍ॅड. ठाकरे यांनी सांगितले की, ‘सूरज परमार हे एकदा मारुतीच्या मंदिरातून बाहेर आले. त्या वेळी मित्र वल्लभ मजेठिया त्यांना भेटले. त्या वेळी मुल्ला, जगदाळे, सुधाकर चव्हाण आणि विक्रांत चव्हाण यांच्यासह ‘घाऱ्या’ आणि ‘पोटल्या’ त्रास देत होते,’असे त्यांनी मजेठियांना सांगितले. तेव्हा ‘घाऱ्या’ कोण? आव्हाड का? असा सवाल मजेठिया यांनी करताच, परमार यांनी होकारार्थी उत्तर दिले, तर ‘पोटल्या’ कोण? म्हस्के का? असे विचारले असता होकार भरला होता.ठाणे महापालिकेचे वास्तुविशारद प्रवीण जाधव हे नगरसेवक आणि परमार यांच्यात मध्यस्थाची भूमिका वठवत होते, अशी धक्कादायक माहितीही ठाकरे यांनी न्यायालयात दिली, तसेच अ‍ॅड. ठाकरे यांनी नगरसेवक रवींद्र फाटक यांच्यासह काही महत्त्वपूर्ण साक्षीदारांची माहितीही सादर केली.कॉसमॉसच्या प्रकल्पामधील बांधकामाला भोगवटा प्रमाणपत्र देण्यास स्थानिक राजकारण्यांनी विरोध केल्याचे करुणा खंबायत यांनी सांगितले, ही बाब सोमवारी न्यायालयात उघड झाली. भोगवटा प्रमाणपत्र नसल्यामुळे ज्या ग्राहकांनी पैसे गुंतविले, ते सदनिका मिळण्यासाठी तगादा लावत होते. त्यामुळे परमार हे कमालीचे तणावाखाली होते, असे परमार यांचा मुलगा अभिषेक यानेही पोलिसांना सांगितल्याचे उघड झाले आहे.सूरज यांच्या बहिणीने आपल्या जबानीत २८ फेब्रुवारी २०१५ रोजी अंधेरी ते ठाणे सूरज यांच्याबरोबर मोटारीतून येताना त्यांनी कॉसमॉसच्या प्रकल्पांना राजकीय नेते कसे त्रास देत आहेत, याची कैफियत मांडली होती. यापुढे त्यांना एक छदामही देणार नसल्याचे सूरज आपल्याला बोलल्याचे बहिणीने पोलिसांना सांगितले होते. (प्रतिनिधी)ठाणे: प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी गेले ७० दिवस अगोदर पोलीस व आता न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांना येथील सत्र न्यायालयाने सोमवारी सशर्त जामीन मंजूर केल्याने, त्यांच्यासह इतर तीन नगरसेवकांच्या जामिनाचा मार्गही सुकर झाल्याचे मानले जाते.ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. बंबार्डे यांच्यापुढे झालेल्या सुनावणीत विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी मुल्ला यांना जामीन देण्यास जोरदार विरोध केला. मात्र, आरोपीचा गुन्हा जन्मठेप अथवा मृत्युदंंड दिला जाऊ शकेल, एवढा गंभीर नाही, असे नमूद करत, १ लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मुल्ला यांची सुटका करण्याचे आदेश दिले. त्यांच्यासह हणमंत जगदाळे, सुधाकर चव्हाण आणि विक्रांत चव्हाण या चारही नगरसेवकांना जामीन दिल्यास साक्षीदार, तसेच पालिकेतील अधिकाऱ्यांवर दबाव येऊन तपासात अडथळा येऊ शकतो, असा दावा ठाकरे यांनी केला. आरोपींना अनिश्चित काळासाठी जामीन देऊ नये, असे आपले मत नाही. मात्र, पोलीस विशेष तपास पथकाकडून या प्रकरणाचा तपास करणारअसल्याने जामिनाचा निर्णय लांबणीवर टाकावा, अशी मागणी केली. अखेर न्यायालयाने मुल्लांना जामीन मंजूर केला. तिघांच्या जामिनावरही येत्या काही दिवसांत सुनावणी व्हायची आहे.