शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाई विरोधकांशी नव्हे, मित्रपक्षांबरोबर; भाजप कार्यशाळेतील सूर; ताकद वाढल्याचा दावा
2
लक्ष्मी भद्र पंचमहापुरुष राजयोग: प्रदोष दिनी २ ग्रहांचे शुभ गोचर, ८ राशींना धनलाभ; उत्तम काळ
3
PPF की SIP.. १५ वर्षांत कुठे तयार होईल किती फंड? वार्षिक ₹१,५०,००० गुंतवणूकीवर किती मिळेल रिटर्न
4
आजचे राशीभविष्य : शनिवार 07 जून 2025; आजचा दिवस शुभ फलदायी, गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल
5
२ राजयोगात रवि प्रदोष: सूर्यासारखे तेज मिळेल, भाग्य उजळेल; ‘असे’ करा व्रत, शिव होतील प्रसन्न
6
"तिच्या लिव्हरचा भाग कापून टाकावा लागला", १४ तास सुरू होती दीपिकाची सर्जरी, शोएबने दिले हेल्थ अपडेट
7
भाडेवाढीनंतर महिनाभरात बेस्टचे ५ लाख प्रवासी घटले; महसूल मात्र ७४ कोटीने वाढला
8
बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएसची पुन्हा सीईटी; निम्म्याच जागांसाठी प्रवेश अर्ज
9
ITI प्रवेशासाठी २७ जूनपर्यंत मुदतवाढ; ६ जूनपासून चॅटबॉटचीही व्यवस्था सुरू
10
ऑगस्ट क्रांती मैदानावरील नमाजावर लगेच निर्णय घ्या; सामाजिक न्याय विभाग, पालिकेला कोर्टाचे निर्देश
11
मिठी सफाई घोटाळाप्रकरणी १५ ठिकाणी छापे; अभिनेता डिनो मोरियाच्या घरावरही धाड
12
Housefull 5: पहिल्या दिवशीच हाऊसफुल कमाई! 'हाऊसफुल ५' सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
13
रशियाचा युक्रेनवर भयंकर हल्ला! ४० क्षेपणास्त्रे, ४०० ड्रोन हल्ल्यात चार ठार, २० जण जखमी
14
पाकिस्तानसाठी ६ मे ची रात्र ठरली ‘कयामत की रात’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
15
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत ४५ किलो शुद्ध सोन्याचा वापर; किंमत सुमारे ५० कोटी
16
मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या संघटनांच्या आठ दहशतवाद्यांना अटक; शस्त्रे, दारूगोळा जप्त
17
विशेष लेख: महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली? अशी निवडणूक विषसमान
18
बँकांना २.५ लाख कोटींची संजीवनी; कर्जांची सोय; अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी निर्णय
19
एलॉन मस्क यांचे वडीलही भारताच्या प्रेमात! अयोध्येतील राम मंदिरात येत रामललाचे घेतले दर्शन
20
RBIचे गिफ्ट, स्वस्तात काढा कर्ज! रेपोदरात अर्धा टक्का जम्बो कपात, कमी होणार EMI

महापौर पदासाठी घोडेबाजार तेजीत...

By admin | Updated: January 18, 2016 00:39 IST

मताचा दर वाढला : काँग्रेस नेत्यांसह इच्छुकांना डोकेदुखी; लाखापासून पंधरा लाखांपर्यंत मागणी

शीतल पाटील --सांगली -महापालिकेच्या महापौर पदासाठी कधी नव्हे इतकी चुरस निर्माण झाली आहे. यापूर्वी नेत्यांचा शब्द प्रमाण मानणारे नगरसेवक आता नेत्यांना डावलून लक्ष्मीदर्शनासाठी उत्सुक आहेत. महापौर निवडीसाठी मतांचा घाऊक बाजार तेजीत आला आहे. प्रत्येक गटाने आतापासूनच मताचा दर ठरविला आहे. जास्तीत जास्त दर देण्याऱ्याला पाठिंबा, असे सूत्र तयार झाले आहे. यात केवळ सत्ताधारी काँग्रेसचेच नगरसेवक नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी आघाडीमधील नगरसेवकांनीही मतांचा लिलाव सुरू केला आहे. अर्थपूर्ण घडामोडींमुळे यंदाची महापौर पदाची निवडणूक इच्छुकांसाठी चांगलीच महागात पडणार असे दिसते. सांगली महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौर-उपमहापौर निवडीसाठी पैशांचा बाजार गरम होणार आहे. तशी चर्चा आता नगरसेवक उघडपणे करीत आहेत. यापूर्वी असा प्रकार कधी फारसा घडलेला नव्हता. महापालिकेच्या स्थापनेपासून पाच वर्षांचा कालावधी वगळता, काँग्रेसचे माजी मंत्री मदन पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे. मध्यंतरी पाच वर्षे राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकास महाआघाडीने महापालिकेची सूत्रे सांभाळली होती. गेल्या अठरा वर्षात महापालिकेत दहा महापौर, उपमहापौर झाले. पण अर्थपूर्ण तडजोडीची चर्चा कधीच झाली नव्हती. किरकोळ स्वरुपात नगरसेवकांचे खिसे गरम केले जात होते. पण तेही नेत्यांच्या इशाऱ्यावर!महापालिकेत काँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे. पण मदनभाऊंच्या निधनानंतर काँग्रेसला गटा-तटाचे ग्रहण लागले आहे. मदनभाऊंच्या हयातीत त्यांच्या शब्दापलीकडे जाण्याची हिंमत नगरसेवकांत नव्हती. महापौर, उपमहापौरापासून ते अगदी सभापती निवडीपर्यंत साऱ्याच पदांच्या उमेदवारीचा निर्णय झाला की, नगरसेवक निमूटपणे तो मान्य करीत. प्रसंगी पदासाठी इच्छुक असलेले नाराज होत, पण नेत्यांच्या आदेशाविरोधात जाऊन बंडखोरी अथवा आर्थिक तडजोडी केल्या जात नव्हत्या. पण आता महापालिकेत सारेच काही बदलले आहे. दबाव गटाच्या नावाखाली काही नगरसेवक एकत्र आले आहेत. सर्वच पक्षांत उघडपणे गट पडले आहेत. त्यातून अर्थपूर्ण तडजोडीला वेग आला आहे. त्यात महापौर पदाची निवडणूक म्हणजे एक मोठी संधी मानून हे गट कार्यरत झाले आहेत. महापौर पदासाठी इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांशी बोलणी सुरू आहेत. कोण किती देणार?, आमच्या गटाचा रेट काय? अशी चर्चा सुरू आहे. अगदी लाखापासून ते पंधरा लाखांपर्यंत मताचा दर निघू लागला आहे. मताचा घाऊक बाजार तेजीत आल्याने नगरसेवकांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. नगरसेवकांना एकसंध ठेवण्याचे आव्हान सर्वच पक्षाच्या नेत्यांसमोर आहे. हे आव्हान कसे पेलतात, यावर बरीच गणिते अवलंबून आहे. नगरसेवक म्हणतात : दाग अच्छे है!अडीच वर्षापूर्वी महापालिका निवडणुकीत नगरसेवकांनी मोठा खर्च केला आहे. एकेका नगरसेवकांचा खर्च ३५ लाखांच्या घरात गेला आहे. निवडणूक आयोगाकडे जरी मर्यादित खर्च सादर केला असला, तरी वस्तुस्थिती निश्चित वेगळी आहे. नगरसेवक झाल्यापासून त्यांच्या पदरात फारसे काही पडलेले नाही. त्यामुळे आजकाल हे नगरसेवक प्रत्येक संधीचा लाभ उठविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात महापौरपदाची निवडणूक म्हणजे त्यांच्यासाठी कुबेराचा खजिनाच! त्यासाठी आपल्यावर काही शिंतोडे उडले, डाग पडले तरी चालेल, अशीच भूमिका नगरसेवकांची आहे. दबाव गटातील नगरसेवक तर ‘दाग अच्छे है’, असे म्हणत त्याचे समर्थन करीत आहेत. हारुण शिकलगारांचे शक्तिप्रदर्शन सुरूचमहापौरपदाचे इच्छुक उमेदवार हारुण शिकलगार यांनी सलग दुसऱ्यादिवशी शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस नेत्या जयश्रीताई मदन पाटील यांची भेट घेऊन शिकलगार यांना संधी देण्याची मागणी केली. इतर इच्छुक सुरेश आवटी, राजेश नाईक यांनीही फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.