शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूची ‘आगाऊ’ दहशत पसरविणारी भोंदू वेबसाईट

By admin | Updated: January 19, 2015 00:56 IST

मृत्यू हा शब्द उच्चारला तरी भल्याभल्यांची पाचावर धारण बसते. मृत्यू अटळ असला तरी तो येऊच नये, असे वाटते. नेमका मृत्यू कसा आणि कोठे होईल, हे पृथ्वी तलावर कुणालाही सांगणे शक्य नाही.

यम है हम : संकेतस्थळावर अंधश्रद्धेला खतपाणी गजानन चोपडे - नागपूरमृत्यू हा शब्द उच्चारला तरी भल्याभल्यांची पाचावर धारण बसते. मृत्यू अटळ असला तरी तो येऊच नये, असे वाटते. नेमका मृत्यू कसा आणि कोठे होईल, हे पृथ्वी तलावर कुणालाही सांगणे शक्य नाही. मात्र आपले नाव आणि जन्म तारीख टाकल्यावर मृत्यू कोठे, कधी आणि कसा होणार हे कळले तर...! विश्वास बसत नाही ना... पण काही महाभागांनी असे एक संकेत स्थळच निर्माण केले. मृत्यूची नेमकी तारीख सांगण्याचा दावा करणाऱ्या या संकेत स्थळाचा भीतीयुक्त बोलबाला सध्या नेटीजन्समध्ये आहे. अंधश्रद्धा आणि बुवाबाजीला खतपाणी घालण्याचा ‘यम है हम’ असाच प्रकार विविध अ‍ॅप्स्वरूनही फिरत आहे. तंत्रज्ञानाने जग जवळ आले. मानवी संवेदना एकमेकांना कळू लागल्या. तंत्रज्ञानाचे अनंत फायदे मानव जातीला होऊ लागले. मात्र या तंत्रज्ञानाचाच आता काहींनी वाईट हेतूनेही वापर सुरू केला आहे. अंधश्रद्धा आणि बुवाबाजीला खतपाणी घालणेही सुरू आहे. सर्व जग एका क्लिकवर आणणाऱ्यांनी आता मृत्यूलाही त्याच क्लिकवर आणून ठेवले की काय, असे वाटायला लागते. या संकेतस्थळावर ‘क्लिक टू फार्इंड हाऊ यु विल डाय?’ असे लिहिलेल्या ठिकाणी क्लिक करताच तुमचे पूर्ण नाव आणि जन्म वर्ष विचारले जाते. ही माहिती रकान्यात भरली की तुमच्या मृत्यूचे वर्ष आणि कारण स्क्रिनवर दिसायला लागते. अशी हायटेक भोंदूगिरी करणारे सदर माहिती फेसबुकवर शेयर करण्याचा तुम्हाला सल्लादेखील देतात. या वेबसाईटला चाचपून पाहण्यासाठी एका कास्तकाराचे नाव आणि जन्म वर्ष नमूद केले असता त्याच्या मृत्यूचे वर्ष २०२७ सांगण्यात आले. म्हणे या इसमाचा मृत्यू अतिरेकी हल्ल्यात होणार आहे. कुठे हा खेड्यातला शेतकरी अन् कुठे अतिरेक्यांच्या बंदुका. थोडक्यात म्हणजे अशी भंपक माहिती पसरवून दहशत निर्माण केली जात आहे. थोतांड ‘यम’च्या या संकेतस्थळावरून तुमच्या मरणाचा वार निश्चित केला जातो.चित्रगुप्तालाही ठाऊक नसेल एवढी माहिती या संकेतस्थळाजवळ असल्याचा फोल दावा आहे. ‘दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए’, असाच काहीसा प्रत्यय ही साईट पाहताना येतो. अनेक महाभागांनी आपल्या मृत्यूची वेळ आणि दिवस या संकेतस्थळावर बघितला असेल. परंतु संकेतस्थळाने सांगितल्याप्रमाणेच मृत्यू झाल्याचा दावा आजपर्यंत कुणीही केलेला नाही, एवढे मात्र खरे.