शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अभूतपूर्व उत्साहात इंदापुरातील अश्व रिंगण

By admin | Updated: July 8, 2016 19:11 IST

विठुमाऊलीच्या सावळ्या रंगाने ओथंबलेले आभाळ... आसावलेल्या धरतीवर भगव्या पताका खांद्यावर घेऊन, पावलात लय धरलेला ह्यग्यानबा तुकारामह्णचा घोष करणारा वारकऱ्यांचा मेळा.

तुकोबारायांचा सोहळा मालोजीनगरीत : टाळ, चिपळ्या, मृदंगाची देहभान हरपवणारी धूनइंदापूर : विठुमाऊलीच्या सावळ्या रंगाने ओथंबलेले आभाळ... आसावलेल्या धरतीवर भगव्या पताका खांद्यावर घेऊन, पावलात लय धरलेला ह्यग्यानबा तुकारामह्णचा घोष करणारा वारकऱ्यांचा मेळा... टाळ, चिपळ्या, मृदंगाची देहभान हरपवणारी धून... त्यानंतर वाऱ्याला लाजवेल अशा वेगाने मानाच्या शुभ्र-कृष्ण रंगाच्या अश्वांनी पूर्ण केलेल्या परिक्रमा... जणू काही याच वेगाने दुष्काळ हटव, अशी पांडुरंगचरणी केलेली आर्जवेच ती... इंदापूरमध्ये पार पडलेला हा रिंगणसोहळा लाखो भाविकांनी आज आपल्या अंत:करणात साठवून ठेवला. सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनी संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांच्या पालखीचे इंदापूर शहरात आगमन झाले. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा उज्ज्वला राऊत, उपनगराध्यक्षा धनश्री वाशिंबेकर यांनी पालखीचे स्वागत केले. अकलूज नाक्यालगत असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती कस्तुराबाई कदम विद्यालयाच्या प्रांगणावर रिंगण सोहळ्यासाठी पालखी दाखल झाली. रिंगणस्थळी प्रथम नगारखाना गाडीचे आगमन झाले.पालखीप्रमुख शांताराम मोरे, अशोक मोरे, सुनील मोरे, अभिजित मोरे, जालिंदर मोरे आदी प्रमुख मान्यवर सूचना देत होते. नगारखाना गाडीने प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर झेंडेकरी धावले. त्यापाठोपाठ तुळशीवाल्या, हंडेवाल्या महिलांनी प्रदक्षिणा पूर्ण करताच विणेकरी, टाळकऱ्यांची दौड झाली. हर्षवर्धन पाटील, नगराध्यक्षा उज्ज्वला राऊत, राजकुमार राऊत यांच्या हस्ते मानाच्या अश्वांचे पूजन झाले. त्यानंतर ज्याची लोक आतुरतेने वाट पाहत होते त्या अश्वांच्या दौडीस सुरुवात झाली. पालखीच्या मानाच्या अश्वाने विजेच्या वेगाने एक प्रदक्षिणा पूर्ण करताच, त्याच्यापाठोपाठ मोहिते-पाटील यांचा अश्वही धावला. तीन प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर अश्वांनी तुकाराममहाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले.प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार वर्षा लांडगे, पोलीस अधिकारी बापू बांगर, गटविकास अधिकारी लहू वडापुरे, पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे, मंगेश पाटील, माऊली चवरे, शेखर पाटील, रघुनाथ राऊत, विशाल बोंद्रे, गिरीश शहा, कृष्णा ताटे, कैलास कदम, अविनाश मखरे, राजेंद्र राऊत, अबुल पठाण, अलका ताटे, सारिका गोळे, कमल पवार, सायरा पठाण, इब्राहिम शेख या वेळी उपस्थित होते. रिंगण सोहळ्यानंतर पालखी श्री नारायणदास रामदास हायस्कूलकडे मुक्कामाकरिता मार्गस्थ झाली. शहरात शिवाजी नागरी पतसंस्थेच्या वतीने वारकऱ्यांना अल्पोपाहार देण्यात आला. कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दोन हजार चष्मेवाटप करण्यात आले. चष्मेवाटपाचा शुभारंभ पद्माताई भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. आईसाहेब रिक्षाचालक-मालक संघटना व उमेश मोरे मित्रपरिवार, पतंजली परिवार, लायन्स क्लब, लायनेस क्लब, युवक काँग्रेस, भगवानराव भरणे नागरी पतसंस्थेच्या वतीने अल्पोपाहार, चहा, पाणी बाटलीचे वाटप करण्यात आले.रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी प्रवेशद्वारापासूनच आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. रिंगणाच्या मध्यभागी इंदापूर नगर परिषदेने षटकोनी शामियाना उभारला होता. त्यामध्ये संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पादुका ठेवण्यासाठी चबुतरा उभारला होता. पहाटे निमगाव केतकीकरांचा पाहुणचार घेऊन सकाळी सहा वाजता पालखी इंदापूरकडे निघाली. सोनमाथ्यावर सोनाई उद्योगसमूहाचे अध्यक्ष दशरथ माने यांनी वारकऱ्यांना मोफत दूध दिले. प्रवीणभैया माने यांनी या वेळी ह्यलोकमतह्णच्या अंकांचे वाटप केले. तरंगवाडीतील गोखळीच्या ओढ्याजवळ वारकऱ्यांनी न्याहारी घेतली.