शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीच्या मतपत्रिकेवर उभ्या-आडव्या बाटलीचे चिन्ह

By admin | Updated: July 28, 2016 01:04 IST

दारूबंदीसाठीच्या मतदानात आता मतपत्रिकेवर उभ्या-आडव्या बाटलीचे चिन्ह देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या संदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

अहमदनगर/पारनेर : दारूबंदीसाठीच्या मतदानात आता मतपत्रिकेवर उभ्या-आडव्या बाटलीचे चिन्ह देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या संदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर, लगेचच हा निर्णय घेण्यात आला. अण्णांनी दारूबंदीसाठी आंदोलन केल्यानंतर, २००२ साली शासनाने काढलेल्या आदेशात दारूबंदीसाठीच्या मतपत्रिकेवर उभ्या-आडव्या बाटलीचे चिन्ह देण्याची तरतूद होती. मात्र, २००८च्या आदेशात हे चिन्ह वगळण्यात आले. ‘मद्यविक्री अनुज्ञप्ती चालू ठेवावी किंवा बंद करावी,’ असा लेखी पर्याय या मतपत्रिकेत असतो. त्यामुळे अशिक्षित महिलांना मतदान करताना अडथळा येतो व दारूविक्रेत्यांचा फायदा होतो, असा अण्णांचा आक्षेप होता. यासाठी अण्णांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बैठकीला उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व या विभागाचे आयुक्त उपस्थित होते. दारूबंदीसाठी ज्या गावात मतदान होईल, तेथे आता मतपत्रिकेवर हे चिन्ह देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. अण्णांच्या पारनेर तालुक्यातील निघोज गावात रविवारी दारूबंदीसाठी मतदान होणार आहे. बावनकुळे यांनी पारनेरच्या तहसीलदारांशी संपर्क साधून, त्यांना मतपत्रिकेवर चिन्ह टाकण्याबाबत आदेश दिले आहेत. कोपर्डीत अत्याचार व खून प्रकरणात आरोपीने नशेतच हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. दारूमुळेच अत्याचाराच्या घटना घडतात, याकडे अण्णांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. (प्रतिनिधी)दारूबंदी मतपत्रिकेत आडव्या बाटलीचे चिन्ह काढून टाकल्याबद्दल आपण हा महिलांवरील अन्याय असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा खोडसाळपणाही उघड केला. मुख्यमंत्री, संबंधित मंत्री व सचिवांच्या बैठकीत सुधारित आदेश काढण्यात आला. - अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक