शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

हमीदच्या सुटकेची पालकांना आशा

By admin | Updated: February 1, 2016 02:48 IST

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयात खटल्याला तोंड देत असलेल्या हमीद अन्सारी याच्या पालकांना आपल्या एकमेव अपत्याच्या सुटकेचा कवडसा दिसत आहे

डिप्पी वांकाणी,  मुंबईपाकिस्तानच्या लष्करी न्यायालयात खटल्याला तोंड देत असलेल्या हमीद अन्सारी याच्या पालकांना आपल्या एकमेव अपत्याच्या सुटकेचा कवडसा दिसत आहे. अंधेरीत वास्तव्यास असलेले निहाल अन्सारी आणि फौजिया अन्सारी यांचा हमीद हा एकमेव मुलगा. हमीदच्या आईवडिलांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची मुंबईत भेट घेतल्यानंतर, त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.२०१२ पासून बेपत्ता असलेल्या हमीदचा ठावठिकाणा त्याचे आईवडील घेत असून, त्यांच्या वतीने पेशावरच्या न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली आहे व त्या याचिकेला प्रतिसाद देताना संरक्षण मंत्रालयाने हमीद अन्सारी आमच्या ताब्यात असल्याचे त्यांना कळविले आहे. हमीदची आई फौजिया अन्सारी या लेक्चरर असून, सरकारने दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्या खूपच समाधानी आहेत व हमीद निश्चितच भारतात परत येईल, अशी त्यांना खात्रीही आहे.हमीद अन्सारी नोव्हेंबर २०१२ मध्ये अफगाणिस्तानची सीमा ओलांडून व्हिसा नसतानाही पाकिस्तानात गेला. हमीद तेथे आदिवासी मुलीची सुटका करण्यासाठी गेल्याचा दावा त्याच्या पालकांनी केला आहे. या आदिवासी मुलीच्या कुटुंबीयांचे ज्यांच्याशी वैर आहे, ते मिटविण्यासाठी तिचे लग्न करून दिले जात होते. १० नोव्हेंबर २०१२ पासून हमीद पूर्णपणे बेपत्ता असून, त्याच्या शोधासाठी त्याचे पालक या कार्यालयाकडून त्या कार्यालयाकडे खेटे घालत आहेत. ‘आम्ही सुषमा स्वराज दोन दिवसांच्या दौऱ्यावर आल्या असताना घाटकोपरमध्ये त्यांची भेट घेतली. त्या आमच्याशी जवळपास १५ मिनिटे चर्चा करीत होत्या व त्यांनी पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना हमीदची भेट घेण्यास सांगेन व ते अधिकारी हमीदचे माझ्याशी बोलणे करून देतील, असेही आश्वासन स्वराज यांनी आम्हाला दिले,’ असे फौजिया अन्सारी म्हणाल्या.फौजिया अन्सारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हमीदला भारतात आणू, असे सुषमा स्वराज यांनी आश्वासन दिले आहे. मला आता सरकार त्याला खात्रीने परत आणेल असे वाटते,’ असे फौजिया म्हणाल्या.