शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

हुंदके आणि हास्याच्या लकेरीने भिंतीही सुखावल्या

By admin | Updated: April 24, 2017 03:09 IST

एखाद्या क्षणिक चुकीपायी कारागृहात जीवन जगावं लागत असलेल्या येरवडा कारागृहातील कैद्यांची, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर भेट

पुणे : एखाद्या क्षणिक चुकीपायी कारागृहात जीवन जगावं लागत असलेल्या येरवडा कारागृहातील कैद्यांची, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर भेट घालून देण्याचा उपक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला. मुलांशी गळाभेट होताना अनेकांनी हुंदके दिले. त्याचबरोबर, आपल्या चिमुरड्यांना पाहून हास्याची लकेरही उमटत होती. आप्तेष्टांना पाहून कैद्यांना आनंदाश्रू आवरत नव्हते. कारागृहात वर्षानुवर्षे शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची नातेवाईकांशी भेट घालून देण्यासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाच्या वतीने दोन वर्षांपासून ‘गळाभेट’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. पाच वर्षांहून अधिक कालावधीसाठी शिक्षा भोगत असलेल्या सुमारे २७५ पुरुष कैद्यांनी आणि २५ महिला कैद्यांनी मुले व नातेवाईकांना भेटण्याची इच्छा प्रशासनाकडे व्यक्त केली होती. कारागृह प्रशासनाने कैद्यांची ही मागणी मान्य केली.कैद्यांनीही आपल्या मुलांना भेटण्याची जय्यत तयारी केली होती. कारागृहात केलेल्या कामाच्या पैशांतून कारागृहाच्याच कॅन्टीनमधून विविध खाद्यपदार्थ खरेदी करून आणले होते. कारागृहाच्या सांस्कृतिक सभागृहात कैदी बसले होते. मुलांना खाऊ भरवताना, कैद्यांचे पाणावलेले डोळे पाहून इतर उपस्थितांनाही गहिवरून आले होते. कैद्यांची लहान मुले वडिलांच्या मांडीवर बसून त्यांच्याशी गप्पा मारण्यात दंग झाली होती.अनेकांनी मुलांना प्रथमच पाहिले होते. त्यामुळे बहुतांश जण मुलांना मांडीवर घेऊन बसले होते. त्यांचे पापे घेत होते. मुलेही आपल्या वडिलांशी गप्पा मारत होती. (प्रतिनिधी)