शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मान्यवर सरसावले

By admin | Updated: July 27, 2015 01:42 IST

मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी याकूब मेमन याला येत्या ३० जुलै रोजी फासावर लटकविण्यासाठी जारी झालेले डेथ वॉरन्ट वैध आहे

नवी दिल्ली : मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी याकूब मेमन याला येत्या ३० जुलै रोजी फासावर लटकविण्यासाठी जारी झालेले डेथ वॉरन्ट वैध आहे की अवैध हा विषय सोमवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयापुढे येणार असतानाच देशभरातील विविध पक्षांचे नेते आणि मान्यवरांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे नवी याचिका सादर करीत शिक्षा माफ करण्याची विनंती केली आहे. शत्रुघ्न सिन्हा, राम जेठमलानी यांचीही नव्या याचिकेवर स्वाक्षरी आहे. याकूबच्या याचिकेबाबत गुणवत्तेनुसार विचार केला जावा यासाठी पुरेसे पुरावे व नवे आधार आहेत, असेही याचिकेत म्हटले आहे. टाडा न्यायालयाने जारी केलेल्या वॉरंटनुसार याकूबला ३० जुलै रोजी फाशी दिली जाईल. राजकीय वाद उफाळला असताना भाजपाने याकूबच्या बचावासाठी समोर आलेल्या पक्षांना क्षुद्र राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.सुनावणीअभावी आदेश अवैध शबनम वि. भारत सरकार या प्रकरणी मे २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा दाखला देत याकूबला सुनावणीची संधी नाकारणे हा व्यथित करणारा भाग असून तो जाचक ठरतो. याकूबने २० वर्षांहून जास्त काळ कोठडीत काढला आहे. मात्र याकूबबाबत वेगळे निकष लावले. राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील आरोपींना फाशीऐवजी जन्मठेप सुनावली आहे.वीरप्पनच्या साथीदारांना तसेच देवेंदरपालसिंग भुल्लर यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित केली आहे. या सर्वांच्या दयायाचिकेवर राष्ट्रपतींनी लावलेला विलंब हे कारण दिले, मात्र याकूबची दयायाचिका गृहमंत्रालयाने विनाविलंब फेटाळली आहे.

दिग्गज एकत्र : जेठमलानी, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह मणिशंकर अय्यर , सीताराम येचुरी, प्रकाश करात, डी. राजा, नसरुद्दीन शाह, महेश भट्ट, एम.के. रैना आणि तुषार गांधी, न्या. पनाचंद जैन, न्या. एच.एस. बेदी, न्या. सावंत यांच्यासह अन्य दिग्गजांचा समावेश आहे. बचावासाठी १५ पानी याचिका सदर १५ पानी याचिकेवर स्वाक्षरी करणाऱ्यांनी विविध कायदेशीर मुद्दे आणि आंतरराष्ट्रीय समझोत्याबाबत युक्तिवाद केला आहे. बॉम्बस्फोट मालिकेचा कट अन्य कुणी रचला असल्याने त्याला फाशीच्या पाशातून सोडविले जावे. याकूबला फाशी दिल्यास देश जातीयवादाच्या आधारावर विभागला जाईल. देश दहशतवादी कृत्ये खपवून घेणार नाही, त्याचवेळी दयेचा अधिकार, माफी आणि न्यायाबाबत समान विचार अवलंबण्यास कटिबद्ध आहे, हा संदेश याकूबची शिक्षा माफ करीत दिला जावा, अशी विनंती आम्ही नम्रपणे करीत आहोत. रक्तपात आणि मृत्यूमुळे हा देश सुरक्षित बनणार नाही. त्यामुळे आपले सर्वांचेच अध:पतन होईल, असेही याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)