मुंबई : जैन उद्योग समूहाचे संस्थापक-अध्यक्ष आणि ठिबक सिंचनाचे प्रणेते पद्मश्री भंवरलाल जैन यांना उद्योग, कृषी, राजकारणासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शनिवारी सायंकाळी पद्मश्री जैन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. जैन कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रार्थना सभेला उपस्थिती दर्शविली. त्यामध्ये लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, ज्येष्ठ पत्रकार दिनकर गांगल, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे आणि कार्यवाह दत्ता बाळसराफ, डॉ. जब्बार पटेल, रिमा अमरापूरकर, एल.के. पुरी, उद्योजक कमल मोरारका, उद्योजक रमेश कलंद्री, उद्योजक मफतराजजी मुनोत, डॉ. माधव राजवाडे, श्रीनिवास साठे, संदीप पाटील, शरद उपासनी, मंगल राजवाडे आदींनी भंवरलाल जैन यांचे पुत्र व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, संचालक अतुल जैन, भंवरलाल जैन यांचे कनिष्ठ बंधू कांतीलाल जैन यांचे सांत्वन केले. या वेळी डॉ. पी. मुंशी, निवृत्त न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, टी.आर.के. सोमय्या उपस्थित होते. तर भंवरलाल जैन यांच्या स्नुषा निशा अनिल जैन, शोभना अजित जैन, नातू अथांग अनिल जैन, अभेदय अजित जैन आणि नात आरोही अशोक जैन, आमोली अनिल जैन, आशुली अनिल जैन हे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मान्यवरांनी वाहिली भंवरलाल जैन यांना आदरांजली
By admin | Updated: March 6, 2016 03:35 IST