शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषा दिनी साहित्यिकांचा सन्मान

By admin | Updated: February 28, 2017 04:34 IST

मराठी भाषा गौरव दिनी राज्य शासन आयोजित कार्यक्रमात विविध साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनी राज्य शासन आयोजित कार्यक्रमात विविध साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला. सोमवारी सायंकाळी गेट वे आॅफ इंडिया येथे रंगलेल्या या भव्य सोहळ््यात विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारविजेते मारुती चितमपल्ली यांना, डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार विजेत्या यास्मिन शेख यांना, कविवर्य मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार विजेते श्याम जोशी यांना, तसेच श्री.पु.भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुणे येथील भारतीय विचार साधना प्रकाशनाला देण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक-लेखक उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान विश्वकोश मंडळाच्या वतीने, ‘पेनड्राईव्हमधील विश्वकोशाच’ लोकार्पणही करण्यात आले.यावेळी मराठी भाषा विभागाचे सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच विविध साहित्य-प्रकारांसाठीचे स्व. यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात आले. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे स्वरुप असलेले पुरस्कार-डॉ. प्रभा गणोरकर यांना कवी केशवसूत पुरस्कार, रमेश नाईक यांना राम गणेश गडकरी पुरस्कार, बा. भो. शास्त्री यांना हरी नारायण आपटे पुरस्कार, प्रकाश बाळ जोशी यांना दिवाकर कृष्ण पुरस्कार, नाट्य लेखक प्रेमानंद गज्वी यांना अनंत काणेकर पुरस्कार, प्रतिमा इंगोले यांना श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार, सुहास बहुळकर यांना न. चि. केळकर पुरस्कार, डॉ. उज्ज्वला सहाणे यांना लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार, सुधीर रसाळ यांना के. क्षीरसागर पुरस्कार, रमेश पतंगे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, संजीवनी खेर यांना शाहू महाराज पुरस्कार, रामदास भटकळ आणि मृदुला प्रभुराम जोशी यांना नरहर कुरूंदकर पुरस्कार, रमेश नारायण वरखेडे यांना महात्मा जोतिराव फुले पुरस्कार, डॉ. नितीन मार्कण्डेय यांना वसंतराव नाईक पुरस्कार, श्रीराम पेडगावकर यांना सी.डी. देशमुख पुरस्कार, दिलीप घोंडगे यांना ना. गो. नांदापूरकर पुरस्कार, हेरंब कुलकर्णी यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार, बी. के कुलकर्णी यांना डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार, संपादक द. दि. पुंडे यांना रा. ना. चव्हाण पुरस्कार, अनुवादक अश्विनी भिडे-देशपांडे यांना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार, डॉ.गिरीश जाखोटिया यांना भाई माधवराव बागल पुरस्कार, डॉ. माणिक बंगेरी यांना सयाजीराव महाराज गायकवाड पुरस्कार यांचा समावेश आहे.५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र पुरस्कार- इग्नेशिअस डायस यांना बहिणाबाई चौधरी पुरस्कार, नितीन थोरात यांना श्री. ना. पेंडसे पुरस्कार, ऋषिकेश वांगीकर यांना ग. ल. ठोकळ पुरस्कार, संदेश कुलकर्णी यांना ताराबाई शिंदे पुरस्कार, राजेंद्र सलालकर यांना रा. भा. पाटणकर पुरस्कार, ज्ञानदा आसोलकर यांना बालकवी पुरस्कार, राजीव तांबे यांना यदुनाथ थत्ते पुरस्कार, तर मधुकर धर्मापुरीकर यांना ना. धों. ताम्हणकर आदींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. (प्रतिनिधी)