शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा येथे भीमसैनिकांना मानवंदना

By admin | Updated: January 2, 2017 05:21 IST

पुणे-नगर रस्त्यावरील भीमा कोरेगाव विजयस्तंभ येथे भीमसैनिकांना मानवंदना देण्यासाठी रविवारी विविध पक्ष संघटनांचे नेते-कार्यकर्ते, आंबेडकरी बांधव मोठ्या संख्येने आले होते.

लोणी कंद (पुणे) : पुणे-नगर रस्त्यावरील भीमा कोरेगाव विजयस्तंभ येथे भीमसैनिकांना मानवंदना देण्यासाठी रविवारी विविध पक्ष संघटनांचे नेते-कार्यकर्ते, आंबेडकरी बांधव मोठ्या संख्येने आले होते. अभिवादन सभा, भीमगीत गायनाचा कार्यक्रम, बुद्धवंदना, सामुदायिक सलामी अशा कार्यक्रमाने परिसर व्यापून गेला होता. १ जानेवारी १८१८ रोजी पेशवे आणि ब्रिटिशांमध्ये भीमा नदीतीरावर युद्ध झाले. त्यामध्ये महार बटालियनने महत्त्वाची भूमिका बजावली आणि पेशवे पराभूत झाले. त्यानिमित्त १८२२ मध्ये या विजयाचे प्रतीक म्हणून विजय रणस्तंभ उभारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यानंतर या स्थळाला भेट दिली आणि तमाम दलित बांधवांचे त्याकडे लक्ष वेधले गेले.केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, भारतीय बौद्ध महासभा अध्यक्षा मीराताई आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, खा. अमर साबळे आदींनी येथे भेट देऊन मानवंदना दिली. सकाळी बुद्धवंदना झाली. त्यानंतर सामुदायिक मानवंदना देण्यात आली. समता सैनिक दलाच्या वतीने शेकडो जवानांच्या उपस्थितीत संचलन करण्यात आले. (प्रतिनिधी)