शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

इमानचा व्हीलचेअरवरून रुग्णालयात फेरफटका

By admin | Updated: April 21, 2017 02:42 IST

जगातील सर्वांत लठ्ठ महिला अशी ओळख असणाऱ्या इजिप्तच्या इमान अहमदचे वजन आता २५० किलोवर आले आहे.

मुंबई : जगातील सर्वांत लठ्ठ महिला अशी ओळख असणाऱ्या इजिप्तच्या इमान अहमदचे वजन आता २५० किलोवर आले आहे. स्लिव्ह गॅस्ट्रेक्टमी शस्त्रक्रिया, फिजिओथेरपी आणि औषधोपचार या सर्व उपचार पद्धतीनंतर आता इमान हसू-बोलू लागली आहे. त्याचप्रमाणे, नुकतेच इमानने व्हीलचेअरवरुन रुग्णालयात फेरफटका मारल्याचा व्हीडीओही रुग्णालय प्रशासनाने यु-ट्युबरील ‘सेव्ह इमान कॉझ’ या वर अपलोड केला आहे. इजिप्तहून तब्बल २५ वर्षानंतर क्रेनच्या सहाय्याने घरातून बाहेर पडलेली इमान मुंबईत ११ फेब्रुवारी रोजी दाखल झाली. त्यावेळेस, तिचे वजन ५०० किलो होते. आता मात्र इमानच्या तब्येतीत वेगाने सुधारणा होत असल्याची माहिती सैफी रुग्णालयाचे डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. इमानचे संगीत ऐकताना, डॉक्टरांशी संवाद साधतानाचे व्हीडीओही अपलोड करण्यात आले आहे. या व्हीडीओज्मध्ये इमानच्या तब्येतीत झालेला बदल हा वैद्यकीय क्षेत्रासाठी आश्चर्यकारक आहे.इमानचे वजन आता नियंत्रित स्थितीत आहे. त्यामुळे आता लवकरच सीटी स्कॅन करण्यात येणार आहे. जेणेकरुन तिच्या उजव्या बाजूच्या पक्षाघाताचे नेमके कारण कळू शकेल असे डॉ. लकडावाला यांनी सांगितले. तर तिचे फिजिओथेरपीचे सेशन दररोज सुरु आहेत. आता केवळ तिच्या मेंदूच्या अद्ययावत स्थितीचा वैद्यकीय अहवालाच्या प्रतिक्षेत आहोत. मागच्या काही दिवसांत इमानला बसता येईल का ? हा प्रश्न सतत मनाला भेडसावत होता आता मात्र ती बराच वेळ व्हीलचेअरमध्ये बूस शकतेय, याचे समाधान असल्याचे इमानच्या वैद्यकीय चमूमधील डॉ. अर्पणा गोविल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)