शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

घरमालकाचा खून करणारा गजाआड

By admin | Updated: April 29, 2016 01:33 IST

घरमालकाच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने वार करून खून करणाऱ्या सराईत गुन्हेगारास भारती विद्यापीठ पोलिसांनी गजाआड केले आहे

पुणे : घरफोडी करून घराबाहेर झोपलेल्या घरमालकाच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने वार करून खून करणाऱ्या सराईत गुन्हेगारास भारती विद्यापीठ पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत दरोडा, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. विरार पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संंघटित गुन्हे अधिनियम (मोक्का) गुन्ह्यामध्ये तो मागील आठ वर्षांपासून फरारी आहे.संदीप ऊर्फ संदीपा ऊर्फ जयकुल नमाशा भोसले (वय २८, रा. वडकीनाला, ता. हवेली, मूळ रा. गुनवरे, ता. फलटण) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या गुन्ह्यात त्याच्यासोबत असलेले साथीदार अद्याप फरारी आहेत. कात्रज येथे राहणारे तानाजी नाना टकले (वय २७, रा. दुर्गा हिल्स, अंजलीनगर) यांचा खून करण्यात आला होता. ही घटना दि. ३ एप्रिल रोजी पहाटे ३ ते ७ या वेळेत घडली होती. घटने वेळी टकले हे रात्री घराबाहेर झोपले होते. त्या वेळी संदीप व त्याच्या एका साथीदाराने घराचा कडी-कोयंडा उचकटून त्यांच्या घरात चोरी केली. या वेळी टकले यांना जाग आली असता संदीपने त्यांच्या डोक्यात वार करून खून केला, अशी माहिती परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली. पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शेखर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, पोलीस कर्मचारी प्रदीप गुरव, विनोद भंडलकर, प्रवीण काळभोर, समीर बागसीराज, बाबा नरळे तसेच पोलीस मित्र चंद्रकांत मोरे, सचिन लिम्हण यांच्या पथकाने ही कामगिरी केली. >या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे गुन्ह्याचा तपास सुरू केला. बारामती, मोरगाव, सुपा, जेजुरी, सासवड, फलटण, पणदरे, निंबळक, वाजेगाव, गुनवरे, दहीवडी, खटाव, दौंड, यवत, लोणी-काळभोर, या भागात फिरून पोलिसांनी गुन्ह्याचा तपास केला. या दरम्यान संदीप हा कानिफनाथ गड परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार चौकशी केली असताना खुनाची कबुली दिली. संदीप हा अभिलेखावरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर दहीवडी, विरार, नालासोपारा या ठिकाणी दरोडा, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच विरार पोलीस ठाण्यातील मोक्या गुन्ह्यांतर्गत तो ८ वर्षांपासून फरार आहे. नालासोपारा येथील गंभीर गुन्ह्यातही तो आठ वर्षांपासून फरार आहे.