शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पित्याला मारहाण करून केले बेघर

By admin | Updated: August 15, 2016 03:45 IST

वृध्द पित्याला जबर मारहाण करून पोटच्या मुलानेच बेघर केल्याचा प्रकार नेरुळमध्ये उघडकीस आला आहे.

सूर्यकांत वाघमारे,

नवी मुंबई- वृध्द पित्याला जबर मारहाण करून पोटच्या मुलानेच बेघर केल्याचा प्रकार नेरुळमध्ये उघडकीस आला आहे. अनेक दिवसांपासून ही वृध्द व्यक्ती नेरुळ परिसरात जखमी अवस्थेत निवाऱ्याच्या शोधात फिरत होती. अखेर एका दक्ष नागरिकाने त्यांची विचारपूस केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यामुळे त्यांना तातडीने उपचार मिळू शकले आहे.रविदास सखाराम माखरे असे या पीडित वृध्दाचे नाव असून ते अंदाजे ८० वर्षांचे आहेत. मागील काही दिवसांपासून ते नेरुळ रेल्वेस्थानक परिसरात जखमी अवस्थेत फिरत होते. उजवा हात खांद्यातून निखळल्यामुळे निकामी झालेला होता. निवाऱ्याच्या शोधात जागा मिळेल त्याठिकाणी बसणाऱ्या या वृध्दाकडे अद्यापपर्यंत कोणीही लक्ष दिले नव्हते. अखेर नेरुळ परिसरातच राहणाऱ्या हरुण सय्यद यांची त्यांच्यावर नजर पडली असता, त्यांनी केलेल्या चौकशीत संपूर्ण प्रकार उघडकीस आला. रविदास माखरे असे त्यांचे नाव असून ते नेरुळ गावातील राममंदिरलगतचे राहणारे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोटच्या मुलानेच जबर मारहाण करुन काही दिवसांपूर्वी घराबाहेर काढल्याचेही त्यांनी सांगितले.हरुण सय्यद यांनी रविदास यांची व्यथा ऐकताच त्यांना तत्काळ तेरणा रुग्णालयात दाखल केले. तसेच नेरुळ पोलिसांनाही सदर घटनेची माहिती दिली. परंतु वृध्दापकाळात त्यांना बेघर करणाऱ्या त्या मुलाचा अद्याप शोध लागलेला नाही. मुलाने आपल्या आईला घरात ठेवले असले तरी तिने धुणीभांडी करुन जमवलेल्या पैशावरही मुलगा अधिकार गाजवत असल्याचे त्यांनी सांगितले.