शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

गृह राज्यमंत्री घेणार तपासाचा आढावा

By admin | Updated: April 8, 2017 01:58 IST

लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुण आणि तरुणीच्या निर्घृण खुनाने लोणावळा व मावळ परिसर हादरला

लोणावळा : लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुण आणि तरुणीच्या निर्घृण खुनाने लोणावळा व मावळ परिसर हादरला असून, विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचे पडसाद शुक्रवारी विधानसभेमध्येही बघायला मिळाले. लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालत तपासकामाचा आढावा घेऊन घटनास्थळाला भेट देणार असल्याचे सांगितले. पर्यटननगरी लोणावळा शहरात शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसोबत मानवतेला काळिमा फासणारी घटना असल्याने लोणावळेकर सुन्न झाले. सिंहगड महाविद्यालयात शिकणारा सार्थक वाघचौरे व श्रुती डुंबरे या दोघांचा रविवारी रात्री आयएनएस शिवाजीसमोरील डोंगरात एस पॉइंट येथे एका झुडपात डोक्यात दगड घालून व बेदम मारहाण करुन खून करण्यात आला होता. (वार्ताहर)पोलिसांच्या हातात काही महत्त्वाचे धागेदोरे लागल्याचे निश्चित सांगितले जात असले, तरी या संदर्भात फार गोपनीयता पाळली जात असून, केवळ तपास सुरू आहे एवढेच उत्तर दिले जात आहे. या भीषण हत्याकांडाचा विषय शुक्रवारी विधानसभेमध्येही उचलला गेला. सभागृहात मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना गृह राज्यमंत्री केसरकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाचा आढावा घेणार असल्याचे सांगितले. पोलीस आॅनर किलिंगपासून एकतर्फी प्रेम, प्रेमाचा त्रिकोण अशा तपासून बघत आहेत.