शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गृहराज्यमंत्र्यांनी केले बीयर बारचे उद्घाटन!

By admin | Updated: May 12, 2015 01:14 IST

दारुबंदीसाठी चळवळ करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याच जिल्ह्यात गृहराज्यमंत्री राम शिंदे व अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी

अहमदनगर : दारुबंदीसाठी चळवळ करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याच जिल्ह्यात गृहराज्यमंत्री राम शिंदे व अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी एका परमीट रुममधील फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन केल्याने सर्वस्तरातून निषेध व्यक्त होत असून, मंत्र्यांच्या या कृतीवर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे़ जिल्ह्यात गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून दारुबंदी चळवळ जोर धरत असताना पालकमंत्री शिंदे व अर्थराज्यमंत्री केसरकर यांंनी सुपा परिसरात एका बारमधील फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन केल्याने टीका सुरू झाली आहे. दारुबंदी मोहिमेतील कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे़ व्यसनमुक्तीच्या प्रचार आणि प्रसारात लोकप्रतिनिधींनी हातभार लावण्याची अपेक्षा असताना मद्याचे उदात्तीकरण केले जात असल्याबद्दल चळवळीतील कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. जिल्ह्णात सध्या दारुबंदीसाठी जनजागृती सुरु आहे. विविध सामाजिक संघटना यात सक्रीय आहेत. लोकप्रतिनिधींकडून कोणताही पाठींबा नसताना या मोहिमेंतर्गत आतापर्यंत ६०० ग्रामपंचायतींनी दारुबंदीचा ठराव संमत करत दारुविरुद्धची चीड स्पष्ट केली आहे. दारुबंदी मोहीम एकीकडे सर्वत्र पोहोचत असताना गृह, आरोग्य, पर्यटन राज्यमंत्रीपद आणि जिल्ह्णाचे पालकमंत्री अशी जबाबदारी सांभाळणाऱ्या लोकप्रतिनिधीनेच बारमालकाबरोबर ऊठ-बस करणे हे सरकारचे नैतिक पातळीवरील अध:पतन असल्याची टिका चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे. शनिवारी उशिरा सायंकाळी पुणे रस्त्यावरील सुपा टोल नाक्याजवळ असलेल्या या हॉटेलचे उद्घाटन झाले. यावेळी मंत्र्यांसोबत काही लोकप्रतिनिधी व अधिकारीही उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्णात दारुबंदीसाठी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी मंत्रीपद पणाला लावले होते़ तर नगरचे पालकमंत्री व समाजाच्या नेतृत्वाचा ठेका घेतलेली नेतेमंडळी स्वयंस्फुर्तीने सुरू असलेल्या दारुबंदी मोहिमेलाही खो बसेल, असे कृत्य करत असल्याची टीका चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)