शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

होमगार्ड ‘मॉक ड्रिल’ केवळ कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 04:36 IST

नैसर्गिक अथवा अन्य संकटाच्या काळात नागरी सुरक्षा स्वयंसेवक मदतीला धावून येतात

डिप्पी वांकाणी,

मुंबई- नैसर्गिक अथवा अन्य संकटाच्या काळात नागरी सुरक्षा स्वयंसेवक मदतीला धावून येतात. यासाठी त्यांना प्रशिक्षणही दिले जाते; पण या एकूण प्रकरणातच गोलमाल असल्याची माहिती समोर येत आहे. मॉक ड्रिल हे कागदावरच होत असून, चक्क गुन्हेगारी स्वरूपाच्या व्यक्तींनाही या सुरक्षारक्षकांत सामावून घेतल्याचे प्रकार घडत आहेत. हा घोटाळा कोट्यवधी रुपयांचा असू शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, नकली ‘मॉक ड्रिल’ प्रकरणाची लवकरच चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. मॉक ड्रिलच्या आयोजनाच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी रक्कम मंजूर करून घेतली खरी; पण कुठलेही प्रशिक्षण दिले गेले नाही. विशेष म्हणजे ७५ वर्षांवरील व्यक्ती जे की शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीत त्यांनाही नागरी सुरक्षा स्वयंसेवक केले जात आहे. या विभागाने वयोमर्यादेबाबतही नवे नियम बनविले असून, अशा ३५,००० दलांची स्थापना करण्यात आली आहे. नागरी सुरक्षेसाठी सरकारकडून दरवर्षी १५ कोटी रुपयांची तरतूद असते; पण प्रशिक्षणासाठी फक्त दोन ते तीन कोटी रुपये खर्च होत आहेत. नैसर्गिक संकट, आग, इमारत कोसळणे, पूर आदी संकटाच्या काळात नागरी सुरक्षा स्वयंसेवक हे मदतीला धावून येतात आणि प्रसंगी प्राथमिक आरोग्यसेवाही पुरवतात. त्यासाठी नियमितपणे मॉक ड्रिल केले जाते. दहा दिवसांच्या प्रशिक्षणासाठी एका स्वयंसेवकास ४५० रुपये दिले जातात, तर एका मॉक ड्रिलसाठी १५० रुपये प्रति दिवस याप्रमाणे रक्कम दिली जाते, अशी माहिती होमगार्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्वयंसेवकासाठी आता वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे करण्यात आली आहे, तर ५५ वर्षांपर्यंतची व्यक्ती यात सहभाग नोंदवू शकेल. >७५ वर्षांचे स्वयंसेवक; शारीरिकदृष्ट्या असक्षमएका ठिकाणी जेव्हा अचानक तपासणी करण्यात आली तेव्हा मॉक ड्रिलसाठी आलेल्या एका स्वयंसेवकाने सांगितले की, आपण मस्टरवर सही करण्यासाठी आलो आहोत.तर काही व्यक्ती हे ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे तर काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे आढळून आले आहे. मॉक ड्रिलच्या आयोजनाच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी रक्कम मंजूर करून घेतली खरी; पण कुठलेही प्रशिक्षण दिले गेले नाही. विशेष म्हणजे ७५ वर्षांवरील व्यक्ती जे की शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीत त्यांनाही नागरी सुरक्षा स्वयंसेवक केले जात आहे.